Gautami Patil New Song : नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गौतमीचा मोठा चाहतावर्ग असून तिच्या दिलखेच अदा चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. गौतमीने आता मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण केलं आहे. 'घुंगरू' या सिनेमाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता गौतमीचं 'लीज लई कडक' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.


ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. मात्र आता गौतमी पाटील 'इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका... आता कसं व्हायचं पावन, चीझ मी लई कडक' म्हणत आहे. सप्तसूर म्युझिकच्या नव्याकोऱ्या गाण्यात गौतमी पाटील झळकली असून या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला आहे.


'लीज लई कडक' गाण्याबद्दल जाणून घ्या...


सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी चीझ लई कडक या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. विकी वाघ यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलेलं हे गाणं वैशाली सामंत यांनी गायलं आहे. तर या गाण्यात गौतमी पाटीलसह कुणाल पाटील, कुणाल मासले, मनोज कुंभार, आदम शेख यांनी भूमिका केली आहे. अतिशय धमाल शब्द, ठेका धरायला लावणारी उडती चाल असल्याने हे गाणं नक्कीच प्रेक्षकांची दाद मिळवणार यात काहीच शंका नाही.






गौतमी पाटील बनली पोलिस ऑफिसर?


'चीझ लई कडक' या गाण्यात एक गोष्ट सांगण्यात आली आहे. गुंडांच्या अड्ड्यावर होणाऱ्या या गाण्यात गौतमी पाटील नेमक काय करते हे जाणून घेण्यासाठी हा म्युझिक व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे. मात्र 'चीझ लई कडक' हे गाणं प्रेक्षकांना वेड लावणारं 'आयटम साँग ऑफ द ईअर' ठरणार आहे. 


गौतमीच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती


गौतमीची हटके गाणी नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतात. माझा कारभार सोपा नसतोय रं, दिलाचं पाखरू, सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, पाटलांचा बैलगाडा अशा तिच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. सोशल मीडियावरही गौतमी चांगलीच अॅक्टिव्ह आहे.



संबंधित बातम्या


Gautami Patil: "दिलाचं पाखरू" नंतर आता "घोटाळा झाला"; सबसे कातील गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा