Gautami Patil : वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या गौतमी पाटीलवरून (Gautami Patil) आता एक नवा वाद निर्माण झाला आहे. आतापर्यंत तिने सादर केलेल्या नृत्यांवर आक्षेप घेतला जायचा. मात्र आता तिच्या आडनावावरुन वाद निर्माण झाला आहे.  गौतमी पाटीलने पाटील आडनाव लावू नये, यासाठी अनेकांनी तीला विरोध केला आहे. गौतमी पाटील ही मराठा समाजाचे नाव खराब करत असल्याचं एका संघटनेचं म्हणणं असून तिने पाटील आडनाव काढावं, अशी धमकी तिला संघटनेकडून देण्यात आली आहे. या संपूर्ण विषयावर गौतमी पाटील ज्या गावात लहानाची मोठी झाली. त्या गावकऱ्यांना नेमकं काय वाटतं जाणून घ्या...


कला ही कला असते आणि गौतमी पाटील येणे संगीत क्षेत्रातील तिची कला जोपासली आहे. तिच्या कलेचा आणि समाजाचा कुठलाही संबंध नाही. गौतमी पाटील हे नाव संपूर्ण देशभरात गाजत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं धुळे जिल्ह्यातील सिंदखेड गावातील गावकऱ्यांचे म्हणणे आहे.


गौतमी पाटीलपेक्षा जगात अनेक सुंदर लोक आहेत. मात्र त्या सुंदर लोकांना पाहण्यासाठी लोक का गर्दी करत नाही. तर गौतमी पाटील सुंदर आहे म्हणून नाही तर तिची कला पाहण्यासाठी लोक गर्दी करतात आणि यात आक्षेपार्ह किंवा समाजाची बदनामी करण्यासारखं काहीही नाही. गौतमी पाटील अल्पावधीच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अनेकांना खुपत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. 


गौतमीने नाव बदलण्यासारखं असं कुठलंही काम केलेलं नाही. ज्या कामामुळे तिचं संपूर्ण देशात नाव झालं ते नाव तिने का म्हणून बदलावं? असा प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी तिचा विरोध करणारा संघटनांना खडेबोल सुनावले आहे.


गावातील महिलांकडून गौतमीचं समर्थन 


गौतमीच्या सिंदखेड (Jalgaon) गावातील महिलांनीही तिचं समर्थन केलं आहे. गौतमीच्या कलेने संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. ती आता कुठल्याही पद्धतीने अश्लील नृत्य करत नाही. ज्यावेळी तिने ते केले होते त्यावेळी तिने माफी मागितली आहे. एक महिला म्हणून आम्ही तिचं समर्थन करत असल्याचं महिलांनी म्हटलं आहे. 


चांगले आणि वाईट  असे समाजात दोन प्रवृत्तीचे लोक असतात. त्यापैकी वाईट लोक हे जर कोणी वर जात असेल ,प्रगती करत असेल तर त्यांना खाली खेचण्याचं काम करत असतात आणि तसाच काहीसा प्रकार सध्या सुरू असल्याचेही या महिलांनी म्हटले आहे.


संबंधित बातम्या


Sambhaji Bhagat : नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटते? लोकप्रिय शाहीर संभाजी भगत म्हणतात...