Gashmeer Mahajani Relation With Father Ravindra Mahajani : अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला म्हणजेच अभिनेता गश्मीर महाजनीला (Gashmeer Mahajani) प्रचंड ट्रोल करण्यात आले. रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर ते त्यांच्या मुलासोबत का राहत नव्हते, पुण्यात एकटे का राहायचे असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण आता वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्याने त्याचं वडिलांसोबत असलेल्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. 


ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत गश्मीर महाजनी म्हणाला,"मुलगा म्हणून मला त्यांच्यासाठी काही करता आलं नाही. तसेच त्यांनी कुटुंबासोबत राहायला हवं असं आम्ही कधी त्यांना जबरदस्तीही केली नाही. त्यांना जेव्हा आम्हाला भेटायचं असायचं तेव्हा ते आमच्यासोबत राहायला यायचे. त्यांचा स्वभाव अत्यंत मूडी होता. त्यांचं स्वत:वर खूप प्रेम होतं. प्रत्येक गोष्ट एकट्याने केलेली त्यांना आवडत असे. कोणी मदत केलेली त्यांना आवडत नसे". 






गश्मीर पुढे म्हणाला,"त्यांचा स्वभाव अत्यंत मूडी होता. दुसऱ्यांनी केलेली मदत त्यांना आवडत नव्हती. अगदी स्वत:चं जेवणदेखील ते स्वत: बनवायचे. त्यांच्या मदतीला जर आम्ही कोणाला पाठवलं तर त्यांनादेखील त्यांनी दोन दिवसापेक्षा जास्त दिवस टिकू दिलं नाही. आमच्याच घरात नाही तर समाजात अनेक ठिकाणी वडील आणि मुलाच्या नात्यामधील गुंतागुंत दिसून येते".


गश्मीर म्हणतो,"वडील एका ठराविक वयानंतर मुलाचे मित्र होऊ शकत नाही. त्यांच्यात वडील आणि मुलगा हेच नेत असतं. पण यामुळे तणाव आणि दुरावा निर्माण होतो. वडिल आणि मुलगा एकमेकांना समजून घेण्यात कमी पडतात. दुरावा आल्याने प्रेम,आपुलकी, आदर या गोष्टी कमी होतात. वडील झाल्यानंतरच प्रत्येकाला या गोष्टीचा अनुभव येईल". 


रविंद्र महाजनी यांचे 15 जुलै 2023 रोजी निधन झाले. पुण्यातील तळेगाव-दाभाडे परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. वयाच्या 77 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून ते मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. हँडसम फौजदार म्हणून ते मराठी मनोरंजनसृष्टीत लोकप्रिय होते. 'जाणता अ जाणता' या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. 


संबंधित बातम्या


Gashmeer Mahajani: 'आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. काही घडत नाहीये, काय करु यार...'; नेटकऱ्याचा प्रश्न, गश्मीर उत्तर देत म्हणाला, 'मी पण...'