Gashmeer Mahajani:  अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. गश्मीर त्याच्या आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देतो.  गश्मीरनं नुकतेच इन्स्टाग्रामवर ‘आस्क गश’ (Ask Gash) हे सेशन ठेवले. या सेशनच्या माध्यमातून त्यानं चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरं दिली.


चाहत्याचा प्रश्न- तुझ्या आयुष्यात नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे तुला ट्रोल करणाऱ्यांना काय उत्तर देशील?


गश्मीरचे उत्तर- कधी मी रिप्लाय दिला असेल पण नंतर मी विचार केला, का? ते माझे जीवन जगत नाहीत आणि जरी त्यांना हवे असले तरीही ते तसं कधीही करू शकत नाहीत. शांततेत राहूया . त्यांच्याकडे वेळ आहे पण माझ्याकडे काळजी घेण्यासाठी खूप लोक आहेत आणि खूप काम आहेत.




चाहत्याचा प्रश्न- आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. काही घडत नाहीये काय करु यार, कळत नाहीये


गश्मीरचं उत्तर- मी पण त्याच प्रोब्लेमधून चाललो आहे.




चाहत्याचा प्रश्न- नमस्कार सर, मी रवींद्र सरांचा फॅन आहे. मी लहानपणी खूप मराठी चित्रपट बघायचो. त्यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो? 


गश्मीरचं उत्तर- मुंबईचा फौजदार


गश्मीरचे वडील  रवींद्र महाजनी  (Ravindra Mahajani)  यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. रवींद्र महाजनी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 'आराम हराम आहे', 'लक्ष्मी', 'लक्ष्मीची पावलं',' देवता', 'गोंधळात गोंधळ', 'मुंबईचा फौजदार' या चित्रपटांमधील रविंद्र महाजनी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


गश्मीरचे चित्रपट


देऊळ बंद, कान्हा, विशू, वन वे तिकीट, बोनस आणि  कॅरी ऑन मराठा या मराठी चित्रपटांमध्ये गश्मीरनं काम केलं. तसेच त्यानं तेरे इश्क में घायल, इमली या हिंदी मालिकांमध्ये देखील गश्मीरनं काम केलं. गश्मीरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  गश्मीर हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतो त्याला इन्स्टाग्रामवर 380K फॉलोवर्स आहेत. गश्मीर हा सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Gashmeer Mahajani: 'जे मी माझ्या वडिलांना सांगू शकत नाही ते मी तुम्हाला...'; चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नाला गश्मीर महाजनीनं दिलं उत्तर