Sushant Singh Rajput Flat Buys The Kerala Story Fame Adah Sharma : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला तीन वर्ष झाली असली तरी आजही तो चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. 14 जून 2020 रोजी त्याचे निधन झाले आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला बसला. मुंबईतील वांद्रे येथील आलिशान फ्लॅटमध्ये त्याने आत्महत्या करत आयुष्य संपवलं. त्यानंतर त्या फ्लॅटला कोणीही भाडेकरू मिळत नव्हता. फ्लॅटला भाडेकरू मिळावा यासाठी मालक वेगवेगळे प्रयत्न करत होते. पण आता बॉलिवूड अभिनेत्री आणि 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) फेम अदा शर्माने (Adah Sharma) हा फ्लॅट विकत घेतल्याचं समोर आलं आहे.
अदा शर्माने (Adah Shrama) सुशांत सिंह राजपूतचा तो फ्लॅट (Sushant Singh Rajput Flat) विकत घेतल्याने तीन वर्षांपासून बंद असलेल्या फ्लॅटला अखेर मालिक मिळाला आहे. सुशांतने आत्महत्या केलेल्या त्या फ्लॅटमध्ये तीन वर्षांपासून कोणीही राहायला तयार नव्हते. त्यामुळे अदा शर्माने हा फ्लॅट विकत घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. अद्याप अभिनेत्रीने यासंदर्भात भाष्य केलेलं नाही.
अदा शर्मा तिची टीम आणि ब्रोकरसोबत सुशांत सिंह राजपूतच्या फ्लॅटकडे रवाना झालेली दिसून आली. अभिनेत्रीने सुशांत सिंह राजपूतचा 'तो' फ्लॅट कधी आणि किती रुपयांना विकत घेतला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. पण गेल्या काही दिवसांपासून या फ्लॅटचे मालक भाडेकरूच्या शोधात होते. या फ्लॅटचं दरमहा भाडं सुमारे पाच लाख रुपये होतं. त्यामुळे आता 'द केरळ स्टोरी'ला मिळालेल्या यशानंतर अभिनेत्रीने हा फ्लॅट विकत घेतल्याचं म्हटलं जात आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचा फ्लॅट चर्चेचा विषय ठरला होता. एकीकडे या फ्लॅटला भाडेकरू मिळत नसल्याने मालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. दुसरीकडे अदा शर्माने हा फ्लॅट विकत घेतला आहे. एबीपी न्यूजने अभिनेत्रीला यासंदर्भात विचारलं असता ती म्हणाली,"काही आनंदाची बातमी असेल तर नक्कीच कळवेल...आता सांगितलं तर आई ओरडेल".
सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत चाहते भावूक
सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत आजही चाहते भावूक होत असतात. 14 जून 2020 रोजी अभिनेत्याने आत्महत्या करत आयुष्य संपवलं. पण काही दिवसांपूर्वी अभिनेत्याची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला नवं वळण आलं. अभिनेत्याच्या कुटुंबियांनीदेखील त्याची आत्महत्या झाली असल्याचा दावा केला होता.
संबंधित बातम्या