Gashmeer Mahajani:  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. गश्मीरनं नुकतेच इन्स्टाग्रामवर  ‘आस्क गश फॉर अ मिनिट्स’ (Ask Gash for A few minutes) हे सेशन ठेवले. या सेशनमध्ये गश्मीरच्या चाहत्यांनी त्याला विविध प्रश्न विचारले. या प्रश्नाला गश्मीरनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.

चाहत्यांचे प्रश्न आणि गश्मीरची उत्तरं

एका नेटकऱ्यानं गश्मीरला इन्स्टाग्रामवर प्रश्न विचारला, 'असे कोणते शब्द आहेत जे तू तुझ्या बाबांना सांगशील?' या प्रश्नाला गश्मीरनं उत्तर दिलं, 'ते शब्द मी सांगितले आहेत. तुम्हाला त्याबद्दल माहिती असण्याची गरज नाही.' 

एका चाहत्यानं प्रश्न विचारला, 'असे कोणते शब्द आहेत, जे तू तुझ्या वडिलांना सांगू शकत नाही' या प्रश्नाला उत्तर देत गश्मीर म्हणाला, जे मी माझ्या वडिलांना सांगू शकत नाही, ते मी तुम्हाला का सांगू'

 

गश्मीरच्या एका चाहत्यानं त्याला चित्रपटांबाबत एका प्रश्न विचारला. त्या चाहत्यानं प्रश्न विचारला की, 'सर तुम्हाला परत छत्रपतींच्या भूमिकेत पाहायला मिळेल का?' या प्रश्नाला गश्मीरनं उत्तर दिलं, 'जरा थांबा, बाकी सगळ्यांना करुद्यात.. हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, त्यांचं करुन झालं की मग आपण करु'

गश्मीरचे वडील  रवींद्र महाजनी  (Ravindra Mahajani)  यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली.  रवींद्र महाजनी यांनी 'जाणता अ जाणता' या मराठी नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'तो राजहंस एक' हे त्यांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक रंगभूमीवर आलं. 

गश्मीरचे चित्रपट आणि मालिका

 गश्मीर (Gashmeer Mahajani)  हा विविध मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. गश्मीरचा काही दिवसांपूर्वी विशू हा चित्रपट रिलीज झाला. देऊळ बंद, कान्हा आणि   कॅरी ऑन मराठा या मराठी चित्रपटांमध्ये गश्मीरनं काम केलं. तसेच त्यानं तेरे इश्क में घायल, इमली या हिंदी मालिकांमध्ये देखील गश्मीरनं काम केलं. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Gashmeer Mahajani: 'योग्य वेळ येईल तेव्हा...'; वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरची पोस्ट