Ganapath Box Office Collection Day 1: अभिनेता  टायगर श्रॉफ (Tiger Shroff)आणि कृती सेनन (Kriti Sanon) यांच्या 'गणपत' (Ganapath) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. काल (20 ऑक्टोबर) हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही या चित्रपटात काम केलं आहे. गणपत या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...


विकास बहल दिग्दर्शित   'गणपत' या चित्रपटात अॅक्शन आणि ड्रामा याचा तडका प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. Sacnilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'गणपत' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी केवळ 2.50 कोटी रुपये कमावले आहेत. आता वीकेंडला हा चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.


'गणपत' हा टायगरचा आतापर्यंतचा सर्वात कमी ओपनिंग-डे कलेक्शन करणारा  चित्रपट आहे. यापूर्वीच्या टायगरच्या चित्रपटांचे ओपनिंग-डे कलेक्शन जास्त होते.   टायगरच्या 'हिरोपंती 2' या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई 6.50 कोटी रुपये होती. तर 'बागी 3' या चित्रपटानं 17 कोटींची कमाई केली होती. टायगरचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'वॉर'ने पहिल्या दिवशी 53.35 कोटींची कमाई केली होती, तर 'स्टुडंट ऑफ द इयर 2'ने ओपनिंग-डेला 12.06 कोटींची कमाई केली होती. 






कृती आणि टायगर हे गणपत या चित्रपटाच्या माध्यमातून नऊ वर्षांनी स्क्रिन शेअर करणार आहेत. या दोघांचा हिरोपंती हा चित्रपट 2014 मध्ये रिलीज झाला होता.  


'गणपथ: अ हिरो इज बॉर्न' या चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी केली आहे. हा चित्रपट जगभरात हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवर यारियां 2 आणि टायगर नागेश्वर राव या दोन चित्रपटांबरोबर गणपत या चित्रपटाची टक्कर झाली. आता हा चित्रपट वीकेंडला किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Ganapath Review : टायगर श्रॉफचा 'गणपत' कसा आहे? वाचा रिव्ह्यू