Ganapath Movie Review : अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) 'गणपत' (Ganapath) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यार त्याच त्याच विषयांवर भाष्य करणाऱ्या कलाकृती पाहून आता कंटाळ आला आहे. हीरो कितीवेळा 100 गुंडांना मारणार आहे. बॉलिवूडकडून नेहमीच आपल्या या तक्रारी असतात. आता साऊथमध्येही हेच चित्र पाहायला मिळत आहे. 'गणपत'चा ट्रेलर तुम्हाला खास वाटला नसेल तर तुम्ही चुकीचे आहात. 'गणपत' या सिनेमात नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वीदेखील झाला आहे. त्यामुळे सर्वात आधी या सिनेमाच्या टीमचं कौतुक. 


'गणपत'चं कथानक काय आहे? (Ganapath Movie Story)


'गणपत' या सिनेमात श्रीमंत आणि गरीब असे दोन जग दाखवण्यात आले आहेत. श्रीमंताघरात राहणाऱ्या गुड्डूची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल. एका डॉनसाठी फायटर शोधण्याचं काम गुड्डूकडे असतं. त्यानंतर डॉन त्याला एका वेगळ्याच जगात पाठवतो. सिनेमात खऱ्या अर्थाने ट्विस्ट येतो. गुड्डूचा एक वेगळा प्रवास सुरू होतो. त्यानंतर आपल्या लोकांना श्रीमंतापासून वाटवण्याचं मिशन हाती घेतो. सिनेमाची गोष्ट साथी असली तरी योग्य पद्धतीने ट्रीटमेंट दिल्याने कलाकृती खूपच मजेदार झाली आहे.


'गणपत' सिनेमा कसा आहे? 


'गणपत' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळेल. टायगरची सिनेमातील एन्ट्री खूपच कमाल आहे. सिनेमा सुरुवातीपासून प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे. त्यामुळे पुढे काय घडणार याची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहते. टायगर आणि कृतीची (Kriti Sanon) क्रेमिस्ट्रीदेखील चांगली आहे. लहान मुलांना हा सिनेमा नक्कीच आवडेल. प्रयोगशील कलाकृती पाहायची असेल तर 'गणपत' हा सिनेमा नक्की पाहा.  


अॅक्शन किंग म्हणून लोकप्रिय असलेल्या टायगरचा 'गणपत'मध्येही अॅक्शन मोड पाहायला मिळाला आहे. टायगरचे ट्रेनिंग सीक्वेंस जबरदस्त आहेत. प्रत्येक सीन पाहताना मजा येते. कृतीनेदेखील आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. एक वेगळ्या प्रकारची भूमिका या सिनेमात कृतीने साकारली आहे. अमिताभ बच्चन लूक वेगळा आहे. त्यांच्या आवाजाने सिनेमाला चारचाँद लावले आहेत. 


विकास बहलने 'गणपत' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. दिग्दर्शकाची सिनेमावरची पकड सिनेमा पाहताना जाणवते. या सिनेमासाठी विकासने खूप मेहनत आणि अभ्यास केला आहे. सलीम सुलेमानने या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. 'हम आए हैं' हे सिनेमातील गाणं खूपच छान आहे. गणपतचं ग्रँड जग एकदा पाहायलाच हवं.