Singham 3 Update: रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमाला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला रोहित शेट्टीचा 'सिंघम' सिनेमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळेच या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 


रोहित शेट्टीने जाहीर केले आहे की अजय देवगणची भूमिका असलेला सिंघम 3 सिनेमाच्या चित्रीकरणाला पुढील वर्षात सुरुवात करणार आहे. त्यामुळे 2022 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार नाही. 


रोहित शेट्टी म्हणाला की, "चित्रपटाचे कथानक काय असेल याची मूलभूत कल्पना आहे. सूर्यवंशी सिनेमाच्या यशानंतर आता सर्कस सिनेमाचे शूटिंग पूर्ण करणार आहोत. त्यासाठी 2 डिसेंबरला उटीला रवाना होणार आहे. 'सिंघम 3' हा एक अॅक्शनचा तडका असलेला सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाच्या चित्रीकरणाला सात महिने लागतील".





रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमा 19 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 5 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला. पण प्रदर्शित होताच कमी कालावधीत या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.


संबंधित बातम्या


'नाव आणि प्रतिष्ठा खराब होत असल्याने वेदना होतात...', फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया


Bigg Boss 15 : बिग बॉसच्या मंचावर आज Salman Khan आणि Rani Mukerji एकत्र, मोठी धमाल होणार


Dhamaka: Kartik Aaryan चा 'धमाका', 'या' तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha