Gandhi Jayanti 2022: आज महात्मा गांधी यांची जयंती (Gandhi Jayanti 2022). महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर, गुजरात येथे झाला. या वर्षी आपण गांधीजींची 153वी जयंती साजरी करत आहोत. भारत देशाच्या स्वातंत्र्यात गांधीजींचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे. अहिंसेच्या मागार्ने त्यांनी लोकांच्या हृदयात स्वातंत्र्याची भावना जागवली होती. बॉलिवूडनेही गांधीजींच्या स्मरणार्थ अनेक चित्रपट बनवले आहेत. या चित्रपटांमध्ये गांधीजींच्या आयुष्याशी संबंधित सर्व बारकावे दाखवण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल...
गांधी (Gandhi)
महात्मा गांधीजींच्या आयुष्यावरील या चित्रपटात ब्रिटिश अभिनेता बेन किंग्सले मुख्य भूमिकेत झळकले होते. 1982मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रिचर्ड अॅटनबरो यांनी केले होते. या चित्रपटाला 8 ऑस्कर पुरस्कार मिळाले. ‘गांधी’ हा चित्रपट महात्मा गांधीजींच्या जीवनावर बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.
द मेकिंग ऑफ महात्मा गांधी (The Making Of Mahatma Gandhi)
श्याम बेनेगल यांच्या ‘द मेकिंग ऑफ महात्मा गांधी’ या चित्रपटात अभिनेता रजत कपूरने गांधीजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात महात्मा गांधींच्या आयुष्यातील ती 21 वर्षे दाखवण्यात आली आहेत, जी त्यांनी दक्षिण आफ्रिकेत घालवली होती.
हे राम (Hey Ram)
कमल हासन, नसीरुद्दीन शहा अभिनीत ‘हे राम’ हा चित्रपट भारताची फाळणी आणि नथुराम गोडसेने केलेली गांधींची हत्या याभोवती फिरतो. 'हे राम' मधील नसीरुद्दीन शहांच्या गांधी लूकला विशेष दाद मिळाली नाही. परंतु, त्यांच्या अभिनयासाठी आणि गुजराती संवादफेकीबद्दल त्यांचे अधिक कौतुक झाले.
गांधी माय फादर (Gandhi My Father)
‘गांधी माय फादर’ हा चित्रपट महात्मा गांधी आणि त्यांचा मुलगा हिरालाल गांधी यांच्यात असलेल्या नातेसंबंधांवर आधारित आहे. या चित्रपटात दर्शन जरीवाला ‘महात्मा गांधी’च्या तर, अक्षय खन्ना ‘हिरालाल गांधी’च्या भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
द गांधी मर्डर (The Gandhi Murder)
2019मध्ये प्रदर्शित झालेला 'द गांधी मर्डर' हा एक ऐतिहासिक-राजकीय थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन करीम ट्रेडिया आणि पंकज सहगल यांनी केले होते. हा संपूर्ण चित्रपट महात्मा गांधींच्या जीवनातील शेवटच्या काळावर केंद्रित आहे. या चित्रपटात महात्मा गांधी यांची हत्या चित्रित करण्यात आली आहे.
हेही वाचा :
Mahatma Gandhi : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह... या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'