Gashmeer Mahajani : अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. आता 'आस्क मी एनिथिंग' या सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांसोबत संवाद साधला आहे.
गश्मीरला एका चाहत्याने विचारलं आहे," तू कमाल आहेस..का बरं? याचं उत्तर देत अभिनेत्याने लिहिलं आहे,"कमाल..माहिती नाही...पण मी धमाल नक्की आहे". एकाने लिहिलं आहे,"आगामी प्रोजेक्टची तयारी सुरू केली आहे". या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्याने लिहिलं आहे,"शेवटच्या टप्प्यापर्यंत तयारी सुरू असते". दुसऱ्या एका चाहत्याने अभिनेत्याला कंटाळा आल्यावर तो काय करतो याबद्दल विचारलं आहे. उत्तर देत अभिनेता म्हणाला,"आस्क मी एनिथिंग' सेशन घेतो".
एका चाहत्याने गश्मीरला विचारलं आहे की,"यशाचा सामना कसा करतोस?". या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला,"यशस्वी झालो की या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल". गश्मीरच्या या उत्तरांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा गश्मीर महाजनी
गश्मीर महाजनी हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठीतील अनेक लोकप्रिय सिनेमांत तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे. 'सरसेनापती हंबीरराव', 'देऊळबंद', 'कान्हा' आणि 'कॅरी ऑन मराठा' या मराठी सिनेमांत तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकला आहे. तसेच 'घायल' आणि 'इमली' या हिंदी मालिकांमध्येही त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. आता त्याच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
मराठी मनोरंजनसृष्टीतला 'हँडसम हंक' गश्मीर महाजनी हा दिवंगत अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वीच रविंद्र महाजनी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गश्मीर पुन्हा एकदा चर्चेत आला.
रविंद्र महाजनी काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. पुण्यातील तळेगाव-दाभाडे परिसरात ते भाड्याने राहत होते. त्यांच्या घरातून दुर्गंधीचा वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घराचे दार तोडून प्रवेश केला तेव्हा ते मृतावस्थेत आढळले. दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
संबंधित बातम्या