Ganapath Teaser Out: अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff), कृती सेनन (Kriti Sanon) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या  गणपत या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये टायगर आणि कृतीचे अॅक्शन सीन्स बघायला मिळत आहेत. तसेच या टीझरमधील अमिताभ बच्चन यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


गणपत या चित्रपटाच्या टीझरमध्ये टायगर श्रॉफचा "जब अपनो पे बात आती है,तो अपनी हट जाती है"  हा डायलॉग ऐकू येतो. तसेच या टीझरमध्ये कृती ही अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. गणपत या चित्रपटाच्या टीझरमध्ये अमिताभ बच्चन हे चेहऱ्यावर बांधलेले कापड आणि डोळ्यावर चष्मा अशा लूकमध्ये दिसत आहेत.  


गणपतचा टीझर  टायगरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानं या टीझरला कॅप्शन दिलं, "इंतेजार का वक्त खतम हुआ… आ गये हैं हम आपको अपनी दुनिया में ले जाने".  अनेकांनी टायगरनं शेअर केलेल्या या टीझरवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


पाहा टीझर






नेटकऱ्यांनी केलं कौतुक


टायगरनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या टीझरला अनेकांनी कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "खूप छान टीझर आहे, हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार आहे, मी या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणार" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "या टीझरमधील सीन्स आणि बॅकग्राऊंड म्युझिक जबरदस्त आहे." टायगरच्या गणपत या चित्रपटाची आता प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


विकास बहल दिग्दर्शित केलेला गणपत हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट  हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हिरोपंती या चित्रपटानंतर टायगर आणि कृतीची जोडी गणपत या चित्रपटात पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. टायगर आणि कृती यांचा हिरोपंती हा चित्रपट 2014 मध्ये रिलीज झाला होता. वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी गणपत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Ganapath : 'जब बाप्पा का है उस पे हाथ तब...'; टायगर श्रॉफच्या 'गणपत' सिनेमाचं पोस्टर आऊट