Gadar 2 Twitter Review: अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2)  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटाचे अनेकांनी अॅडव्हान्स बुकिंग केले होते.  हा चित्रपट आज (11 ऑगस्ट) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. 'गदर 2' चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर करण्यात सुरुवात केली आहे. जाणून घेऊयात नेटकऱ्यांनी शेअर कलेलेल्या 'गदर 2' चित्रपटाचा रिव्ह्यूबाबत...


'गदर 2'  या चित्रपटात तारा सिंह आणि सकिना यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. तसेच तारा सिंहचं त्याच्या मुलावर असणारे प्रेम देखील दाखवण्यात आलं आहे. 'गदर 2'   हा चित्रपट पाहिल्यानंतर एका नेटकऱ्यानं ट्विटरवर या चित्रपटाच्या रिव्ह्यू शेअर केला आहे. या रिव्ह्यूमध्ये त्यानं लिहिलं, या उत्कृष्ट कलाकृतीचा प्रत्येक भाग आवडला. उत्कृष्ट दिग्दर्शन आणि परफॉर्मन्स. हा चित्रपट ब्लॉकबस्टर आहे.' या नेटकऱ्यानं  चित्रपटाला साढेचार स्टार दिले आहेत. 






"गदर 2'चित्रपटाचा पूर्वार्ध  चांगला आहे, सनी देओलची एंट्री माइंडब्लोइंग आहे, गाणी, वडील आणि मुलगा प्रेमाचा अँगल आणि अमीषा पटेल छान आहेत.एकूणच हा एक चांगला टाईमपास आहे." असं एका युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं.










अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' हा 2001 मध्ये आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. यामध्ये सनी देओलने तारा सिंहची भूमिका साकारली तर अमिषा पटेलने सकिनाची भूमिका साकारली.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


Gadar 2 Star Cast Fees: कुणी 20 कोटी तर कुणी 60 लाख; 'गदर 2' चित्रपटासाठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन