Sunny Deol Gadar 2 New Poster : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या त्याच्या आगामी 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तो बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. आता या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 


'गदर 2'मधील सनी देओलच्या नव्या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्याने पोस्टर शेअर करत खास कॅप्शन लिहिलं आहे. त्याने लिहिलं आहे,"जेव्हा कुटुंब आणि देशाचा प्रश्न येतो तेव्हा तारा सिंहसमोर कोणताही शत्रू टिकू शकत नाही". 'गदर 2' 11 ऑगस्टला येणार प्रेक्षकांच्या भेटीला". 






'गदर 2'च्या पोस्टरमध्ये सनी देओलने काळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केलेला दिसत आहे. तर डोक्यावर पगडीदेखील घातली आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्याने डोक्यावर बैलगाडीचं चाक घेतलेलं दिसत आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यावरील राग स्पष्ट दिसत आहे. हे पोस्टर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे. आता बॉक्स ऑफिसवर पुन्हा धमाका होणार, 'गदर 2' पुन्हा इतिहास रचणार, हा सिनेमा ब्लॉकबस्टरर ठरणार, अशी कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


'गदर 2' कधी रिलीज होणार? (Gadar 2 Released Date)


'गदर' हा सिनेमा 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सिनेमाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सनी देओलसह अमीषा पटेल (Ameesha Patel) 'मुख्य भूमिकेत झळकणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तारा सिंह आणि सकीनाची प्रेमकहानी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 'गदर 2' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


'गदर 2' या सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनसह नाट्य पाहायला मिळणार आहे. अनिल वर्माने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर शक्तिमान तलवारने या सिनेमाचं कथानक लिहिलं आहे. 'गदर : एक प्रेम कथा'च्या आगामी भागात सनी देओल, अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.


संबंधित बातम्या


Gadar 2: 'गदर-2' मध्ये ऐकायला मिळणार नाना पाटेकर यांचा आवाज; सकिना आणि तारा सिंहची प्रेमकहाणी लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस