Box Office Collection: ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक चित्रपट थिएटमध्ये रिलीज झाले. त्यामधील गदर-2 (Gadar 2), ओएमजी 2 (OMG 2) आणि जेलर (Jailer) या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अभिषेक बच्चनचा (Ahishek Bachchan) घूमर (Ghoomer) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. पण या चित्रपटानं इतर चित्रपटांच्या तुलनेत कमी कमाई केली. जाणून घेऊयात  गदर-2, ओएमजी 2, जेलर  आणि घूमर या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...


ओएमजी 2 चे कलेक्शन 


SacNilk च्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारच्या ओएमजी 2 या चित्रपटानं 13 व्या दिवशी जवळपास 3 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचं एकूण कलेक्शन जवळपास 123.72 कोटी झाले आहे. वीकेंडला ओएमजी 2 चित्रपटाचे कलेक्शन वाढेल आणि हा चित्रपट 150 कोटींच्या क्लबमध्ये सामी होईल, असा अंदाज लावला जात आहे.






'गदर 2' नं केली कोट्यवधींची कमाई


SacNilk च्या रिपोर्टनुसार गदर 2 चित्रपटाने 13 व्‍या दिवशी सुमारे 10.40 कोटी कमावले आहेत. त्यानंतर त्याचे एकूण कलेक्शन 411.10 कोटी होईल. गदर-2 चित्रपटामध्ये अमिषा पटेल आणि सनी देओल यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.






'जेलर' ची कमाई


SacNilk च्या  सुरुवातीच्या ट्रेंडच्‍या रिपोर्टनुसार, 'जेलर' चित्रपटानं रिलीजच्‍या 14व्‍या दिवशी म्हणजेच बुधवारी (23 ऑगस्ट) 3.65 कोटी कमावले आहेत. यानंतर 13 दिवसांची 'जेलर'ची एकूण कमाई आता 295.65 कोटींवर गेली आहे.  जेलर या चित्रपटामध्ये रजनीकांत यांच्यासोबतच  मोहनलाल, जॅकी श्रॉफ,   तमन्ना भाटिया आणि योगी बाबू या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.


घुमर चित्रपटाचे कलेक्शन


घुमर हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी रिलीज झाला. या चित्रपटाचं अनेक प्रेक्षकांनी तसेच क्रिकेटर्सनं कौतुक केलं. रिलीजनंतर सहाव्या दिवशी या चित्रपटानं जवळपास 0.33 कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाचं आतापर्यंतचं एकूण कलेक्शन 4.41 एवढे झाले आहे. घुमर या चित्रपटामध्ये सैयामी खेर आणि अभिषेक बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.


संबंधित बातम्या


Box Office : थिएटरमधल्या गर्दीने 100 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; तीन दिवसांत दोन कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिला 'जेलर','गदर 2' अन् 'OMG 2'