मुंबई : सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर आरोप होऊ लागले आहेत. सलमान खान स्टारर फिल्म 'दबंग', 'बेशरम' अशा चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा अभिनव कश्यप याने सलमान, भाऊ अरबाज, सोहेल आणि वडील सलीम खान यांनी करिअर संपवण्याचा गंभीर आरोप लावला आहे. अशातचं इंडस्ट्रीशी संबंधित फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) संस्था सलमानच्या समर्थनार्थ उतरली आहे.
FWICE चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे ने एबीपी न्यूज शी बोलताना म्हणाले, की "जर अभिनव कश्यप याला सलमान खान किंवा त्याच्या कुटुंबीयांविषयी काही तक्रार असेल तर त्याने आधी दिग्दर्शकांची संस्था इंडियन फिल्म अँड टेलीविजन डायरेक्टर्स एसोसिएशन (IFTDA) कडे तक्रार करायला हवी होती. अभिनवने अशा प्रकारे खुलेआम आरोप लावणे चुकीचे आहे. इतकी वर्षा त्याने आमच्याकडे तक्रार का केली नाही?" अशोक दुबे म्हणाले, "IFTDA दिग्दर्शकांच्या अडचणींवर गांभीर्याने विचार करते. FWICE संस्थेनेही अभिनव कश्यपच्या तक्रारीची दखल घेतली असती. मात्र, अभिनवने असे न करता सलमानच्या कुटुंबावर आरोप लावले चुकीचे आहे.
सलमानचे समर्थन
अभिनवने सलमान वर लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत. लॉकडाऊनच्या काळात सलमान खान याने FWICE या संस्थेच्या 23 हजार कर्मचारी आणि तांत्रिक कामगारांच्या खात्यात कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले आहेत. ज्यातून सलमानच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो, असे सांगत अशोक दुबे यांनी सलमानचं समर्थन केलं आहे.
"जावेद अख्तर मला म्हणाले होते तू आत्महत्या करशील," कंगना रनौतचा गंभीर आरोप
अभिनव कश्यप वर मानहानिचा खटला
अभिन कश्यपने केलेल्या आरोपांवरुन सोहेल खान याने अभिनवच्या मानहानीची केस दाखल केली आहे. अरबाज खानने एबीपी न्यूजशी बोलताना याला दुजोरा दिला. हे सर्व आरोप सलमान आणि आमच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळेच आम्ही अभिनवच्या विरोधात कायदेशी कारवाई केली असल्याचे अरबाज म्हणाला. दरम्यान, यावर आम्ही अभिनवशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता यावर त्यांनी कोणताही प्रतिक्रिया दिली नाही.
काय आहेत अभिनवचे आरोप?
दिग्दर्शक अभिनव कश्यपने सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहे. माझा अनुभव यापेक्षा काही वेगळा नाही. मी देखील खूप तणावातून गेलो आहे. दहा वर्षांपूर्वी 'दबंग 2' च्या मेकिंगमधून अरबाज खान आणि सोहेल खान यांच्यामुळे बाहेर काढण्यात आलं. हे लोकं माझं करिअर कंट्रोल करू इच्छित होते. मला खूप घाबरवण्यात आलं. धमकवण्यात आलं. अरबाजने माझा दुसरा प्रोजेक्ट 'अष्टविनायक' देखील खराब केला. तसेच माझ्या 'बेशरम' या सिनेमाला देखील सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांनी खराब करण्याचा प्रयत्न केला पण तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला.
Kangana Ranaut | जावेद अख्तर यांनी आत्महत्येची भीती दाखवली होती, कंगना रानौतचा आरोप