मुंबई : वादग्रस्त ट्वीटसाठी प्रसिद्ध असणारे अभिनेते ऋषी कपूर यांनी भारतीय अंडर-19 संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि शुबमान गिल यांचं कौतुक केलं आहे. हे दोघेही खेळाडू भारतीय क्रिकेटचे भविष्यातील सुपरस्टार आहेत, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
अंडर-19 विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि फलंदाज शुबमान गिल यांनी दमदार कामगिरी केली आहे. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध शुबमान गिलने नाबाद शतकी खेळी करत मोलाची कामगिरी केली. या विश्वचषकातील आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात शुबमान गिलने दमदार फलंदाजी केली आहे.
सलामीवर फलंदाज पृथ्वी शॉनेही प्रत्येक सामन्यात भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला येणाऱ्या शुबमान गिलने खंबीरपणे भारतीय डाव सांभाळला. भारताच्या या युवा फलंदाजांच्या खेळीतील सातत्यानेच टीम इंडियाने सेमीफायनलपर्यंत धडक मारली आहे.