Bollywood Singers : नुकताच गायक सोनू निगम (Sonu Nigam) याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापूर्वीही अनेक गायकांना कला आणि मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळण्याचा मान मिळाला आहे. अर्थात, सोनू निगम आता जवळपास तीन दशकांपासून सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. परंतु, इतर अनेक गायक आहेत ज्यांनी मनोरंजनाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.


आजच्या अनेक लोकप्रिय गायकांमध्ये श्रेया घोषाल (Shreya ghoshal), नेहा कक्कर (Neha Kakkar), बादशाह (Badshah) यांचा देखील समावेश आहे. पण हे गायक एक गाणे रेकॉर्ड करण्यासाठी किती पैसे घेतात, हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया...


नेहा कक्कर


एका रिपोर्टनुसार, आघाडीची गायिका नेहा कक्कर एका गाण्यासाठी 15 ते 18 लाख रुपये फी घेते.


अरिजित सिंग


अरिजित सिंग हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांपैकी एक आहे. रिपोर्टनुसार, अरिजित सिंग एका गाण्यासाठी 18 ते 20 लाख रुपये आकारतो.


बादशाह


सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांच्या यादीत गायक-रॅपर बादशाहचाही समावेश आहे. त्याच्या नावावर अनेक हिट गाण्यांसह, बादशाह आजकाल सर्वात जास्त फॉलो केलेल्या आणि ऐकल्या जाणार्‍या गायकांपैकी एक बनला आहे. एका गाण्यासाठी तो 18 ते 20 लाख रुपये आकारतो.


मिका सिंग


रिपोर्टनुसार, पंजाबी गायक मिका सिंग एक गाणे गाण्यासाठी 20 ते 22 लाख रुपये घेतो.


मोहित चौहान


गायक मोहित चौहान एका गाण्यासाठी 15 ते 17 लाख रुपये आकारतो.


श्रेया घोषाल


सर्वात लोकप्रिय महिला पार्श्वगायिकांपैकी एक, श्रेया घोषाल प्रत्येक गाण्यासाठी 25-27 लाख रुपये घेते, ज्यामुळे ती इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी गायिका बनली आहे.


सुनिधी चौहान


रिपोर्टनुसार, सुनिधी चौहान एक गाणे रेकॉर्ड करण्यासाठी 12-16 लाख रुपये घेते.


सोनू निगम


काही रिपोर्ट्सनुसार गायक सोनू निगम एका गाण्यासाठी 11-15 लाख रुपये घेतो.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha