Rakhi Sawant Bigg Boss 15 : बिग बॉस -15 (Bigg Boss 15) शो सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) बिग बॉसमधून बाहेर पडली. त्या आधी  अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) बाहेर पडला. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यावर कॉन्ट्रव्हर्सी किंग बिचुकलेने सलमान खानवर ( Salman Khan) आरोप केले. सलमानला कोणी मोठं झालेलं बघवत नाही, त्याचा 20 वर्षांचा इतिहास बघा, असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला असं म्हणत बिचुकलेने सलमान खानवर निशाणा साधला होता. अभिजीत बिचुकलेनं केलेल्या या वक्तव्यावर आता कॉन्ट्रव्हर्सी क्वीन अभिनेत्री राखी सावंतनं प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

नुकतीच राखीनं तिच्या पतीसोबत म्हणजेच रितेश सिंहसोबत मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये जेव्हा तिला  अभिजीत बिचुकलेबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ती म्हणाली 'सलमानबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर  बिचुकलेने समाधी घेतली आहे. सलमान खानवर टीका केल्यानंतर त्याने स्वतःचे नुकसान करून घेतले.' पुढे राखी म्हणाली, 'माझ्या सलमानबद्दल कोणी काहीही बोलले तर मी त्याला सोडणार नाही. ' राखीचा पती म्हणाला, 'अभिजीतनं असं म्हणायला नको होतं.' अभिजीत बिचुकले  आणि राखी सावंत घराबाहेर पडल्यानंतर सध्या सहा स्पर्धकांमध्ये बिग बॉसची  स्पर्धा रंगणार आहे. करण कुंद्रा, शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, निशांत भट, प्रतीक शेहजपाल आणि रश्मी देसाई हे बिग बॉसचे टॉप सहा स्पर्धक आहेत. बिग बॉस-15 चा ग्रँड फिनाले 29 ते 30 जानेवारीच्या दरम्यान पार पडणार आहे. 

इतर बातम्या :

Continues below advertisement

Shweta Tiwari Apologies : अखेर ‘त्या’ वक्तव्यावर श्वेता तिवारीचे स्पष्टीकरण, लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल मागितली माफी

Abhijeet Bichukale : असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला; अभिजीत बिचुकले सलमान खानवर भडकला

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha