Bollywood Movies 2023 : सिनेप्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षात अनेक बिग बजेट हिंदी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हे सिनेमे सणासुदीला रिलीज होणार असल्याने प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणार आहे. आदिपुरुष, पठान अशा अनेक सिनेमांचा यात समावेश आहे.
आदिपुरुष - मकरसंक्रात
दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा आगामी 'आदिपुरुष' सिनेमा पुढील वर्षी मकरसंक्रातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा रामायणावर आधारित आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पौराणिक कथा पुन्हा एकदा सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.
पठाण - प्रजासत्ताक दिन
'पठाण' हा सिनेमा 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खानच्या बहुचर्चित 'पठाण' सिनेमात शाहरुख खानसह दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा प्रजासत्ताक दिनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रॉकी और रानी की प्रेम कहानी - वेलेंटाइन डे
वेलेंटाइन डे दरम्यान 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
भोला - राम नवमी
आजय देवगन आणि तब्बूचा भोला हा सिनेमा राम नवमीच्या मुहुर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. अजयचा हा सिनेमा 'कॅथी' या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.
बवाल - गुडफ्रायडे
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा आगामी 'बवाल' सिनेमा गुडफ्रायडेला रिलीज करण्यात येणार आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
टायगर 3 - ईद
भाईजानसाठी ईद खूप जवळची आहे. त्यामुळेच सलमान खान त्याचा आगामी 'टायगर 3' हा सिनेमा ईदच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. त्यामुळे सलमानचे चाहते ईदची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अॅनीमल - स्वातंत्र्यदिन
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा 'अॅनीमल' सिनेमा स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत.
फायटर - गांधी जयंती
2023 च्या गांधी जयंतीला बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा बहुचर्चित 'फायटर' सिनेमा रिलीज होणार आहे.
डंकी - नाताळ
शाहरुख खान आणि तापसी पन्नूचा आगामी 'डंकी' हा सिनेमा नाताळच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचदरम्यान अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा 'बडे मियां और छोटे मियां' हा सिनेमा रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या