Oscars Committe : 'ऑस्कर पुरस्कार' (Oscars Awards) हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा पुरस्कार आहे. आता दाक्षिणात्य अभिनेता सूर्या (Suriya) आणि बॉलिवूड अभिनेत्री काजोलला (Kajol) ऑस्कर कमिटीच्या सदस्यपदासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. जगभरातील 397 सेलिब्रिटींना ऑस्टर कमिटीच्या सदस्यपदासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. 


ऑस्कर कमिटीच्या सदस्यपदासाठी निमंत्रण मिळणारा सूर्या पहिला दाक्षिणात्य अभिनेता


सूर्याच्या नावाची लोकप्रियता दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येदेखील आहे. सूर्याचा 'जय भीम' सिनेमा चांगलाच गाजला होता. हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला असला तरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. चाहत्यांनी सूर्याचे प्रचंड कौतुक केले होते. ऑस्करच्या शर्यतीतदेखील हा सिनेमा सामील झाला होता. आता ऑस्कर कमिटीच्या सदस्यपदांच्या नावांच्या यादीत सूर्याच्या नावाचादेखील समावेश आहे. ऑस्टर कमिटीच्या सदस्यपदासाठी निमंत्रण मिळणारा सूर्या हा पहिला दाक्षिणात्य अभिनेता आहे. 


काजोलच्या नावाचादेखील समावेश


दाक्षिणात्य अभिनेता सूर्या व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री काजोललादेखील ऑस्कर कमिटीच्या सदस्यपदासाठी निमंत्रण मिळालं आहे. तर बॉलिवूड सिनेमांची निर्माती रीमा कागदीलादेखील निमंत्रण मिळालं आहे. 397 सेलिब्रिटींच्या यादीत भारतातील तीन सेलिब्रिटींचा समावेश आहे. 


यंदा भारतदेखील होता ऑस्करच्या शर्यतीत


94 व्या अकादमी पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत होता. भारताच्या 'रायटिंग विथ फायर' हा माहितीपटाला ऑस्करचे नामांकन मिळाले होते. रिंटू थॉमस आणि सुश्मित घोष यांनी या माहितीपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. तर बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्राने ऑस्करच्या प्री इव्हेंटचे सूत्रसंचालन केलं होतं. 


'कोण होणार करोडपती'च्या मंचावर काजोलने नुकतीच लावलेली हजेरी


'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि लाडकी अभिनेत्री काजोल उपस्थित राहिली होती. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पहिल्यांदाच या मायलेकीचा अनोखा बंध प्रेक्षकांना पाहायला मिळाला.  एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर' (ADAPT)  या संस्थेसाठी त्या 'कोण होणार करोडपती' हा खेळ खेळल्या. 


संबंधित बातम्या


Will Smith : ‘थप्पड’ प्रकरणाचा विल स्मिथच्या वैवाहिक जीवनावर परिणाम! पत्नीसोबत घटस्फोट घेणार?


Will Smith Banned: थप्पड प्रकरण विल स्मिथला भोवलं, 10 वर्षांसाठी अभिनेत्यावर ‘ऑस्कर’ बंदी!