TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


मराठमोळ्या संदीप पाठकचा कॅनडामध्ये डंका 


आजवर बऱ्याच कलाकारांनी आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशांपैकीच एक असणाऱ्या अभिनेता संदीप पाठकनंही अगदी पदार्पणापासून रसिकांसोबतच समीक्षकांचंही लक्ष वेधून घेत विविधांगी भूमिका साकरण्याचं काम केलं आहे. कोणतीही व्यक्तिरेखा लीलया साकारण्याचं कौशल्य अंगी असणाऱ्या संदीपनं नुकताच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सिनेमहोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपलं नाव कोरत मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.


‘आरआरआर’ने गाठला 500 कोटींचा टप्पा


‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, चित्रपटाने सोमवारी 17 कोटींची कमाई केली. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीची एकूण कमाई 4 दिवसांत 92 कोटींवर गेली आहे. याचाच अर्थ हा चित्रपट लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. याची शुक्रवारच्या ‘आरआरआर’च्या कलेक्शनशी तुलना केली, तर कमाईत 10-15 टक्क्यांची किंचित घट दिसून येत आहे. तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.


5 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अखेर ‘ब्रह्मास्त्र’चं शूटिंग पूर्ण


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग तब्बल गेल्या पाच वर्षांपासून सुरु होते. दरम्यान नुकतेच रणबीर आणि आलिया वाराणसीच्या रस्त्यांवर शूटिंग करताना दिसले होते. चित्रपटाचा दिग्दर्शन अयान मुखर्जी याने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अखेर चित्रीकरण पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे.


कोडा ते ड्युन; घरबसल्या पाहू शकता 'ऑस्कर' विजेते चित्रपट


 94 व्या आकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार 2022 विजेत्यांची घोषणा काल (28 मार्च) झाली. अनेक कलाकारांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, कॉस्ट्यूम डिझायनर आणि  सर्वोत्कृष्ट चित्रपट या कॅटेगिरीमधील पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये ड्यून, कोडा, किंग रिचर्ड क्रुएला, ड्राइव माय कार आणि अॅनकँटो या चित्रपटांना अनेक कॅटेगिरीमधील पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ऑस्कर विजेते हे चित्रपट अनेकांनी पाहिले नसतील. तुम्ही घरबसल्या हे चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 


'लोच्या झाला रे' आता अॅमेझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित


अंकुश चौधरीच्या 'लोच्या झाला रे'(Lochya Zala Re) सिनेमाने महाराष्ट्रासह परदेशातील प्रेक्षकांना चांगलेच हसवले. हा सिनेमा 4 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता'लोच्या झाला रे' हा सिनेमा गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच 1 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.


संबंधित बातम्या


Rashmika Mandanna : एक्स्प्रेशन क्वीन रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबत झळकणार, संदीप रेड्डी वांगा करणार दिग्दर्शन


TOP 5 Bollywood Movies : कोरोनानंतर 'या' पाच सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कोट्यवधींची कमाई


The Kapil Sharma Show : सुमोना चक्रवर्तीने ‘द कपिल शर्मा’ शो सोडला? जाणून घ्या नेमकं काय झालं...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha