Aditya Narayan : सारेगमप (Sa Re Ga Ma Pa) या सिंगिंग रिअॅलिटी शोमधून नुकताच निघालेला होस्ट आणि पार्श्वगायक आदित्य नारायणने (Aditya Narayan) आपल्या नवजात बाळाचे नाव सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले आहे. इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी गमतीशीर गप्पा मारताना आदित्यने मुलीचे अनोखे आणि गोंडस नाव सांगितले आहे. 'त्विषा' नारायण झा असे आदित्यच्या मुलीचे नाव आहे. याबरोबरच चाहत्यांनी आदित्यला त्याच्या मुलीचा फोटो शेअर करण्याबाबत विचारले असता, त्याने अतिशय मजेशीर उत्तर दिले.  


आदित्य नारायणने नुकतेच सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक प्रश्नोत्तर सत्र आयोजित केले होते. ज्यामध्ये चाहत्यांनी त्याला सारेगामा शो सोडण्यापासून त्याच्या कुटुंबापर्यंत प्रश्न विचारले. याच वेळी आदित्यला एका चाहत्याने त्याच्या मुलीचे फोटो शेअर करण्याबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी उत्तर देताना आदित्य म्हणाला, यासाठी त्याला बाळाच्या आईची परवानगी घ्यावी लागेल. तसेच आदित्यने लिहिले की, वडीलधारी मंडळी जसं सांगतात त्याप्रमाणे 40 दिवसांनंतरच बाळाचा फोटो दाखवला पाहिजे.    




चाहत्यांनी आदित्यला बाळाच्या नावाबद्दल विचारले तेव्हा त्याने नाव सांगणारी एक चिठ्ठीही लिहिली. आदित्यने सोशल मीडियावर लिहिले की, मी एकटाच बाळाच्या नावावर संशोधन करत होतो, बाकी सर्वजण त्या मुलाचे नाव शोधण्यात व्यस्त होते. 





आदित्यच्या लहान मुलीचा जन्म 24 फेब्रुवारी 2022 रोजी झाला. आदित्यने 4 मार्च रोजी चाहत्यांबरोबर त्याची गोड बातमी शेअर केली. सिंगरने सोशल मीडियावर लिहिले की, श्वेता आणि मी देवाचे आभारी आहोत की त्याने 24.02.2022 रोजी आम्हाला एक सुंदर मुलगी आशिर्वादच्या रूपात दिली.  


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha