मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज हरभजन सिंह सध्या क्रिकेटपासून दूर आहे. परंतु, लवकरच तो मोठ्या पडद्यावर आपला डेब्यू करणार आहे. हरभजन सिंह 'फ्रेंडशिप' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत आपलं पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 2020मध्ये रिलीज होणार आहे. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक क्रिकेटर मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. दरम्यान, हरभजन सिंहच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर मेकर्सनी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केलं आहे. ज्यामध्ये दोन हात दिसत असून त्यामध्ये पोलिसांच्या बेड्या दिसत आहेत.


चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पोस्टर हरभजन सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलं आहे. 'फ्रेंडशिप' या चित्रपटाचं दिग्दर्शन जेपीआर आणि श्याम सूर्या यांनी केलं आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती जेपीआर आणि स्टालिन यांनी केलं आहे. हा चित्रपट याच वर्षी म्हणजेच, 2020मध्ये प्रदर्शित होणार आहे.





दरम्यान, हरभजन सिंहने भारतीय संघाच्या वतीने 103 कसोटी सामन्यांपैकी 417 विकेट्स घेतले आहेत. ज्यामध्ये 16 वेळा त्याने चार आणि 25 वेळा पाच विकेट्स घेतले आहेत. तसेच वनडे क्रिकेटबाबत बोलायचे झाले तर हरभजन सिंहने 236 वनडे सामन्यांमध्ये 269 विकेट्स घेतले आहेत. ज्यामध्ये तो 3 वेळा पाच आणि 2 वेळा चार विकेट्स घेतले आहेत. तसेच टी-20 सामन्यांमध्ये हरभजन सिंह 28 सामन्यांमध्ये 25 विकेट्स घेतले आहेत.


हरभजन सिंहची आंतराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द 


39 वर्षीय भारतीय गोलंदाज हरभजन सिंहने भारतीय संघाकडून शेवटचा कसोटी सामना 2015मध्ये श्रीलंकेच्या विरूद्ध खेळला होता. तसेच त्यांनी शेवटचा वनडे सामना साऊथ आफ्रिकेच्या विरोधात मुंबईत 2015मध्ये खेळला होता. त्यानंतर 3 मार्च 2016मध्ये हरभजन आपला शेवटचा टी-20 सामना खेळला होता.


दरम्यान, हरभजन सिंह म्हणजेच, सर्वांचा लाडका भज्जी बॉलिवूडमध्ये आपलं पदार्पण करणार आहे. अशातच भज्जीच्या पदार्पणाची बातमी कळताच चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे क्रिकेटचं मैदान गाजवणारा भज्जी आता बॉक्स ऑफिस गाजवणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


संबंधित बातम्या : 

'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज

सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'चं पोस्टर रिलीज; कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारणार

आमिरच्या एका शब्दावर खिलाडी अक्षयने बदलली 'बच्चन पांडे'ची रिलीज डेट

शाहरुख खान म्हणतो, मी मुस्लीम आहे, माझी पत्नी हिंदू आणि आमची मुलं हिंदुस्तान