FilmFare Award Winners Full List : मंगळवारी (30 ऑगस्ट) मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 67 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 चे (FilmFare Award Winners) आयोजन करण्यात आले होते. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली. यासोबतच दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कॅटेगिरीमधील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला, तर अभिनेत्री क्रिती सेननला (Kriti Sanon) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
यंदाचा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार सिद्धार्थ मल्होत्राच्या शेरशाह या चित्रपटाला मिळाला आहे. मराठमोळ्या सईला देखील मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. जाणून घेऊयात विजेत्यांची संपूर्ण लिस्ट:
सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणवीर सिंग (83)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - क्रिती सॅनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट चित्रपट - शेर सर्वोत्कृष्ट
दिग्दर्शक - विष्णुवर्धन (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) - विकी कौशल (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) - विकी कौशल (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) - विद्या बालन (शेरनी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सई ताम्हणकर (मिमी)
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता - पंकज त्रिपाठी (मिमी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - बी प्राक (मन भराया शेरशाह)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – असीस कौर (रतन लांबिया – शेर शाह)
सर्वोत्कृष्ट गीत - कौसर मुनीर (लेहरा दो - 83)
सर्वोत्कृष्ट पटकथा - शुभेंदू भट्टाचार्य, रितेश (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट संवाद – वरुण ग्रोवर, दिबाकर बॅनर्जी (संदीप और पिंकी फरार)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता पुरुष - एहान भट्ट (99 गाणी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री - शर्वरी वाघ (बंटी और बबली)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक - सीमा पाहवा (रामप्रसादचा तेरावा)
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Urfi Javed : गणपती बाप्पाच्या भक्तीत रममाण झाली उर्फी जावेद! सोशल मीडियावर शेअर केला खास व्हिडीओ...
- Amitabh Bachchan Statute : ‘महानायका’वरील प्रेम तर पाहा! अमेरिकेतील भारतीय कुटुंबाने घरातच उभारला ‘बिग बीं’चा पुतळा
- Celebrity Diary : 'मैत्री' हा शब्द ऐकल्यावर प्रार्थना बेहेरेला आठवतो 'हा' व्यक्ती; आवडता खाद्यपदार्थ कोणता आहे जाणून घ्या...