Smita Patil Birthday : मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या स्मिता पाटील (Smita Patil) यांचा आज जन्मदिन आहे. अनेक सिनेमांच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. 'मंथन', 'भूमिका', 'आक्रोश', 'चक्र', 'चिदंबरम', 'मिर्च मसाला', 'उंबरठा' हे स्मिता पाटील यांचे गाजलेले सिनेमे आहेत. 


वयाच्या 19 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण


स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात झाला. तर वयाच्या 31 व्या वर्षी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. 'राजा शिवछत्रपती' या सिनेमाच्या माध्यमातून 1974 साली वयाच्या 19 व्या वर्षी स्मिता पाटील यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. हा सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्या 'चल', 'सामना', 'निशांत', 'मंथन' अशा सिनेमांत दिसून आल्या. 


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ते पद्मश्री


स्मिता पाटील यांनी 1977 साली 'भूमिका' नामक सिनेमात काम केलं. श्याम बेनेगलच्या या सिनेमात त्या अमोल पालेकरसोबत रुपेरी पडद्यावर झळकल्या होत्या. या सिनेमातील कामासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले. 10-12 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये स्मिता पाटील यांनी दोनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. तसेच त्यांना 'पद्मश्री' पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. 


वृत्तनिवेदक ते अभिनेत्री


सिनेमात गंभीर भूमिका करणाऱ्या स्मिता पाटील खऱ्या आयुष्यात मात्र खूपच मस्तीखोर आहेत. स्मिता पाटील यांनी एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे दहा सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. सिनेमांत काम करण्यापूर्वी स्मिता पाटील दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून काम करायच्या. 


'भीगी पलकें' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान स्मिता पाटील राज बब्बरच्या प्रेमात पडल्या. 80 च्या दशकात त्यांनी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली. राज बब्बर यांनी स्मिता पाटीलआधी नादिरासोबत लग्न केलं होतं. पण स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी नादिराला सोडलं. 


स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झालेली गाणी - 


आज रपट जाएँ तो हमें ना उठई यों, आपकी याद आती रही रातभर, गगन सदन तेजोमय, जांभूळ पिकल्या झाडाखाली, तुम्हारे बिना जीना लागे घर में, दिखाई दिए यूँ के, मी रात टाकली, साजन के गुण गाये, सावन के दिन आये


संबंधित बातम्या


Smita Patil : वृत्तनिवेदिका ते सशक्त अभिनेत्री... सौंदर्याची परिभाषा बदलणाऱ्या स्मिता नावाच्या वादळाची गोष्ट