Fighter New Poster : 'फायटर' (Fighter) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नुकतचं या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टरमधील हृतिक, दीपिका आणि अनिल कपूरच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सिनेसृष्टीसाठी 2023 हे वर्ष खूपच खास आहे. 2024 मध्येही अनेक दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खानच्या पठाणने 2023 ची दमदार सुरुवात केली होती. आता 'फायटर' हा सिनेमा 2024 गाजवण्यासाठी सज्ज आहे. सर्व सिनेप्रेमी या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
'फायटर'चं नवं पोस्टर आऊट!
'फायटर' या बहुचर्चित सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. दीपिका पादुकोण, हृतिक रोशन आणि करण सिंह ग्रोवरसह अनेक कलाकारांनी हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तसेच या सिनेमातील दोन गाणी आणि एक टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनच्या जोडी या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडदा गाजवणार आहे.
हृतिक रोशनने शेअर केलं 'फायटर'चं पोस्टर (Hrithik Roshan Shared Fighter Poster)
हृतिक रोशनने 'फायटर' या सिनेमाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"एअर ड्रॅगन महिन्याभरात तुम्हाला भेटायला येत आहेत. 'फायटर' पाहा रुपेरी पडद्यावर. 25 जानेवारी 2024 पासून 3D आणि IMAX थिएटर्स.. भेटूया देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला". फायटरच्या नव्या पोस्टरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर दिसून येत आहेत.
'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'फायटर'
'फायटर' हा सिनेमा 25 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 2024 ची धमाकेदार सुरुवात करेल, असे म्हटले जात आहे. 'फायटर' या सिनेमासंदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवणार आहे. तगडी स्टारकास्ट असणारा हा सिनेमा आहे. पहिलं पोस्टर आऊट झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या