Fighter Box Office Collection Worldwide : 'फायटर' (Fighter) या सिनेमाने 2024 ची दमदार सुरुवात केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने दणदणीत कमाई केली आहे. 'फायटर' हा सिनेमा 25 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 350 कोटींची कमाई केली आहे.


'फायटर' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच शानदार कमाई करत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 350 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 350 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा हा या वर्षातला पहिला सिनेमा आहे. 


सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) 'फायटर'चा भारतीय बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. रिलीजच्या 25 दिवसांनंतरही हा सिनेमा कोट्यवधींची कमाई करत आहे. 'फायटर' या सिनेमात दीपिका पादुकोण, अनिल कपूर आणि करण सिंह ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 






दमदार स्टारकास्ट असलेला 'फायटर' (Fighter Movie Starcast)


'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. तसेच अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख, तलत अजीज, संजीव जयसवाल, ऋषभ साहनी आणि आशुषोष राणा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


हृतिक रोशनच्या 'वॉर' आणि 'बँग बँग' या सिनेमांनी आतापर्यंत ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई केली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित वॉर हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 53 कोटींची ओपनिंग कमाई केली. तर बँग बँग या सिनेमाने ओपनिंग डेला 27.54 कोटींची कमाई केली होती. 


'फायटर' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. हृतिक रोशन (Hrithik Roshan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमातील हृतिक-दीपिकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. आता ओटीटीवरदेखील धमाका करण्यासाठी हा सिनेमा सज्ज आहे. हृतिकच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. एकंदरीतच हृतिकच्या फायटरने वर्षाची सुरुवात दमदार केली आहे.


संबंधित बातम्या


Fighter Movie Review : कमालीची हवाई अ‍ॅक्शन दृश्ये असलेला, देशभक्ती जागवणारा 'फायटर'