Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan)  हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. शाहरुखचा चाहता वर्ग मोठा आहे.  नुकताच शाहरुख हा दुबईला (Dubai) एका इव्हेंटसाठी गेला होता. या इव्हेंटमधील काही चाहत्यांना  शाहरुख भेटला. या इव्हेंटमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला शाहरुखला किस करताना दिसत आहे.


दुबईमधील इव्हेंटच्या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख हा ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखची मॅनेजर  पूजा ददलानी आणि काही बॉडीगार्ड्स दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला दिसते की एक व्यक्ती शाहरुखच्या हाताला किस करतो. त्यानंतर शाहरुखसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते गर्दी करतात. त्या गर्दीमधील एक महिला शाहरुखच्या गालावर किस करते. दुबईमधील इव्हेंटच्या या व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


एका नेटकऱ्यानं शाहरुखच्या या व्हायरल व्हिडीओला कमेंट केली, 'हे लोक लकी आहे, आम्ही तर भारतात राहून पण त्याला भेटू शकलो नाही.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'एखाद्या फॅननं जर किस केलं, तरी शाहरुख चिडत नाही.' काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. 


पाहा व्हिडीओ: 






शाहरुखचे आगामी चित्रपट


शाहरुख लवकरच जवान आणि डंकी या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  शाहरुख हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो.  दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम हे त्याचे चित्रपट हिट ठरले. 


शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाला मिळाली प्रेक्षकांची पसंती


काही महिन्यांपूर्वी शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  या चित्रपटात शाहरुखसोबतच, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यासोबतच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Shah Rukh Khan: शाहरुखचं एक ट्वीट अन् स्विगीचे डिलिव्हरी बॉइज पोहोचले मन्नत बाहेर; फोटो व्हायरल