Father's Day Special Films : जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' (Father's Day) साजरा केला जातो. वडील आणि मुलांच्या नात्यावर भाष्य करणारे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यंदाचा 'फादर्स डे' वडिलांसोबत साजरा करुन तुमचं नातं अधिक घट्ट करण्याचा तुमचा विचार असेल तर घरबसल्या 'हे' सिनेमे नक्की पाहा...


सिनेमाचं नाव : दंगल (Dangal)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स


दंगल (Dangal) : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या 'दंगल' या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमात आमिर खानने महावीर सिंह फोगटांची भूमिका साकारली होती. या सिनेमात महावीर सिंह फोगट आपल्या मुलींना कुस्तीचं प्रशिक्षण कसं देतात आणि त्यांची लेक गीता फोगट कुस्तीमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कशी ठरते याचं चित्रण करण्यात आलं आहे. वडील-मुलीच्या संघर्षाची ही कथा प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. 


सिनेमाचं नाव : पीकू (Piku)
कुठे पाहू शकता? सोनी लिव्ह


'पीकू' या सिनेमात दीपिका पादुकोन आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा वडील-मुलीच्या अतूट नात्यावर भाष्य करणारा आहे. वडिलांच्या प्रेमापोटी लग्न न करण्याचा निर्णय घेतलेल्या मुलीची गोष्ट या सिनेमात मांडण्यात आली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना सोनी लिव्हवर पाहता येईल. 


सिनेमाचं नाव : अंग्रेजी मीडियम (Angrezi Medium)
कुठे पाहू शकता? हॉटस्टार


इंग्रजी शाळेत शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करणाऱ्या वडिलांची गोष्ट 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. आजही आपल्या लेकाने इंग्रजी शाळेत शिक्षण घ्यावं अशी इच्छा असणारे अनेक वडील आहेत. इरफान खानचा हा सिनेमा खूपच भावनिक आहे. हा सिनेमा प्रेक्षक हॉटस्टारवर पाहू शकतात. 


सिनेमाचं नाव : कुछ कुछ होता है (Kuch Kuch Hota Hai)
कुठे पाहू शकता? प्राइम व्हिडीओ


करण जौहरचा 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा 1998 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील वडील-मुलीचं गोड नातं प्रेक्षकांना भावतं. या सिनेमात शाहरुख खान आणि काडोल मुख्य भूमिकेत आहे. 


गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल (Gunjan Saxena : The Kargil Girl)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स


बाप-लेकीच्या नात्यावर भाष्य करणारा 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' हा सिनेमा आहे. लेकीचं स्वप्न साकार करण्यासाठी वडिलांना करावा लागणारा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे. 


संबंधित बातम्या


Father's Day 2023 : वडिलांप्रती प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजेच 'फादर्स डे', वाचा या दिनाचा इतिहास आणि महत्त्व