Fashion Designer Rohit Bal Passes Away :
प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
'फॅशन मायस्ट्रो' रोहित बल यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सर्वसामान्यांमध्ये रोहितचा चेहरा सर्वांनाच माहीत नसला तरी फॅशनच्या जगात रोहित बल हे एक मोठं नाव होतं. फॅशन जगताची समज असणाऱ्यांसाठी रोहित बल यांचं जाणं एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही. रोहित बल यांनी 'कौन बनेगा करोडपती' या टेलिव्हिजन शोमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे कॉस्ट्युम डिझाईन करत असे.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचं निधन
प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. रोहित बल यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज चित्रपटसृष्टींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यामध्ये सोनम कपूर आणि अनन्या पांडे यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानेही रोहित बल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
'फॅशन मायस्ट्रो'च्या जाण्यानं सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक
रोहित बल यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. रोहित बल यांना लहानपणापासूनच फॅशन डिझायनर बनण्याची इच्छा होती, म्हणूनच त्यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर फॅशन जगतात एन्ट्री घेतली. त्यांनी नवी दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी इथे शिक्षण घेतलं. 1986 मध्ये रोहित यांचा भाऊ राजीव सोबत ऑर्किड ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापन केली. त्यानंतर त्यांनी 1990 मध्ये त्याचा शो सुरू केला, तेव्हा त्याने फॅशन जगताला नवा 'फॅशन मायस्ट्रो'मिळाला.
अनन्या पांडेसह अनेक सेलिब्रिटींनी दिली श्रद्धांजली
रोहित बल इंडस्ट्रीमध्ये 'गुड्डा' या टोपणनावाने ओळखले जायचे. अभिनेत्री अनन्या पांडेनेही रोहित बल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अलीकडेच अनन्या लॅक्मे फॅशन वीक 2024 मध्ये रोहित बलच्या कमबॅक शोमध्ये दिसली होती. तिने शोमधील रोहित बलसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलंय, "गुड्डा ओम शांती." फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी रोहित बलच्या निधन दुःखद आणि धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. पुलकित सम्राटने इंस्टाग्राम स्टोरीवर रोहित बल यांना श्रद्धांजली दिली आहे.
सोनम कपूरची खास पोस्ट
सोनम कपूरने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय, "प्रिय गुड्डा, तुझ्या निधनाबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. तुला जाणून घेण्याचा, तुझ्या डिझाइन्स घालण्याचा आणि तुझ्यासाठी अनेक वेळा फिरण्याचा बहुमान मला मिळाला. तुझ्या आत्म्याला शांती लाभो, मी नेहमीच तुझी सर्वात मोठी चाहती असेन".
महत्त्वाच्या इतर बातम्या :