Singham Again Box Office Collection : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित सिंघम अगेन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल अशी अपेक्षा होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सिंघम अगेन चित्रपट थिएटरमध्ये धमाका करण्याची अपेक्षा होती आणि तसंच घडताना दिसत आहे. रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पण, त्याला समीक्षकांकडन नकारात्मक प्रतिसाद मिळाला. सिंघम अगेन चित्रपटाला समीक्षकांकडून निगेटिव्ह रिव्ह्यूज मिळाले. असं असूनही, सिंघम अगेन चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 3' ला मात दिली आहे. याचा अंदाज तुम्ही सिंघम अगेनच्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून लावू शकता.
'सिंघम अगेन'चा बॉक्स ऑफिसवर धमाका
अभिनेता अजय देवगणचा मोस्ट अवेटेड चित्रपट सिंघम अगेन हा दिवाळी धमाका करत मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मल्टीस्टारर चित्रपटाची अनेक वर्षांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते, जी अखेर संपली. दिवाळीच्या मुहूर्तावर सिंघम इगेन चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला रिलीज झाल्यानंतर समीक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या, पण असं असतानाही चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे. सिंघम अगेनने पहिल्याच दिवशीच्या कमाईत कार्तिक आर्यनच्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' ला मागे टाकलं आहे.
निगेटिव्ह रिव्ह्यूजनंतरही छप्पर फाड कमाई
SACNL च्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, सिंघम अगेन चित्रपटाने पहिल्याच दिवशी 5,12,545 तिकिटे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये विकली, ज्यामुळे 15.7 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. बसेल, ब्लॉक सीट्ससह रिलीज होण्यापूर्वीच, चित्रपटाने ॲडवान्स बुकिंगमध्ये एकूण 18.69 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सिंघम अगेन चित्रपटाने पहिल्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 27.06 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
'सिंघम अगेन'ने 'भुल भुलैया 3' ला टाकलं मागे
अजय देवगणच्या (Ajay Devgn) सिंघम अगेन (Singham Sgain Box Office Collection) चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन कार्तिक आर्यनचा 'भूल' 3 चित्रपटाच्या तुलनेत अधिक आहे. 1 नोव्हेंबर रोजीसंध्याकाळी 6 वाजेपर्यंत या चित्रपटाने 21.29 कोटींची कमाई केली आहे. हे अद्याप निश्चित आकडे नाहीत. हे प्राथमिक आकडे असून त्यामध्ये बदल होऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :