Farhan Akhtar : अभिनेता, दिग्दर्शक, गायक आणि गीतकार असणाऱ्या फरहान अख्तरचा (Farhan Akhtar) आज वाढदिवस आहे. विविधांगी ओळख असेलेल्या फरहान अख्तरचा जन्म 9 जानेवारी 1974 साली मुबंईतील एका इराणी-मुस्लिम कुटुंबात झाला.


फरहान अख्तरने आपल्या अष्टपैलू कामगिरीतून आपल्या कार्यक्षेत्राची सुरुवात 'दिल चाहता है' या 2001 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात दिग्दर्शक म्हणून केली. त्यानंतर लक्ष्य (2004), डॉन (2006), पॉझिटिव्ह (2007), डॉन 2 (2011) यांसारखे अनेक सिनेमे त्याने दिग्दर्शित केले. 


दिग्दर्शन करत असताना फरहानने 2008 साली 'रॉक ऑन' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अनेक गाजलेल्या सिनेमांत त्याने काम केलं आहे. लक बाय चान्स (2009), द फकिर ऑफ व्हेनिस(2009), कार्तिक कॉलिंग कार्तिक (2010), जिंदगी ना मिलेगी दोबारा (2011), भाग मिल्खा भाग (2013), शादी के साईड इफेक्ट्स (2014), दिल धडकने दो (2015).


अन् फरहान शिबानी प्रेमात पडला...


फरहानच्या खासगी आयुष्यात त्याचे नाव कुठल्याही अभिनेत्री सोबत जोडले गेले नव्हते.  वर्ष 2000 मध्ये फरहानचे लग्न अनुदा बाबानी या सेलिब्रिटी व हेअर स्टायलिस्ट सोबत झाले. शाक्या व अकिरा या दोन मुली त्यांना झाल्या. नंतर अनुदा व फरहान यांचा घटस्फोट झाला. 2019 आली क्रिकेट प्रेझेंटर शिबानी दांडेकर सोबत फरान अख्तरचे नाव जोडले गेले. अनेक वेळा सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी आपल्या प्रेमाची ग्वाही दिली. गेल्या वर्षी ते दोघे लग्नबंधनात अडकले. 


फरहान अख्तरला मिळालेले पुरस्कार - 


फरहान अख्तरला 2001 साली 'दिल चाहता है' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर ‘रॉक ऑन’ला सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. फरहान अख्तरला "रॉक ऑन" साठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.


आईच्या सूचनेमुळे लिहिला ‘दिल चाहता है’


महाविद्यालयीन शिक्षण सोडल्यावर फरहान हा कुठलेही काम करत नव्हता. यावेळी त्याच्या आईला फरहानचे हे वर्तन आवडायचे नाही. यापासून त्रस्त होऊन फरहानच्या आईने त्याला एक सूचना केली. एक वर्षात काहीतरी काम करावे लागेल नाहीतर त्या घरात राहता येणार नाही, अशी स्पष्ट ताकीद फरहानच्या आईने त्याला दिली.  याच भीतीने फरहानने 'दिल चाहता है' हा चित्रपट लिहिला होता.


संबंधित बातम्या


Farhan Akhtar On Bollywood : 'बॉलिवूडला कंबर कसावी लागेल'; फरहान अख्तरनं सांगितला 'मिस मार्वल' मध्ये काम करण्याचा अनुभव