Farhan Akhtar 120 Bahadur : एक्सेल एंटरटेनमेंट प्रस्तुत '120 बहादुर' मध्ये फरहान अख्तर देशाच्या इतिहासातील एक सर्वोच्च वीर, मेजर शैतान सिंह भाटी PVC यांची भूमिका साकारत आहे. 1962 च्या रेजांग ला युद्धात त्यांनी आपल्या 120 सहकाऱ्यांसह प्राणांची बाजी लावत अतुलनीय शौर्य दाखवले होते. या युद्धावर आधारित हा वॉर ड्रामा फक्त फरहानचे मोठ्या पडद्यावर पुनरागमनच नाही, तर एका जबाबदार कलाकाराच्या भूमिकेत पुन्हा एन्ट्री देखील ठरणार आहे.
रिअल लाईफमधील हिरोचे पात्र साकारणे केवळ अभिनय नव्हे तर ती एक भावना, ती एक जबाबदारी असते. गेल्या काही वर्षांमध्ये हिंदी सिनेमाने अशा अनेक पात्रांना रुपेरी पडद्यावर आणलं आहे. त्यांनी देशासाठी संघर्ष केला, विजय मिळवला आणि इतिहास घडवला.
अशाच काही प्रभावी रोल्सवर एक नजर टाकूया,
1. फरहान अख्तर '120 बहादुर' मधील मेजर शैतान सिंह भाटी
'120 बहादुर' या चित्रपटात फरहान अख्तर हे मेजर शैतान सिंह यांची भूमिका साकारत आहेत, ज्यांनी 1962 मध्ये रेजांग ला येथे आपल्या 120 सैनिकांसह शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. या चित्रपटाद्वारे एक विसरलेले पण प्रेरणादायक युद्धकथानक पुन्हा उलगडले जाणार आहे. फरहानने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत आणि तयारी याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. हे पात्र त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील एक नवा शिखर ठरू शकतो.
2. विक्की कौशल – ‘सॅम बहादुर’ मधील फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ
विक्की कौशलने आपल्या अद्वितीय शैलीत सॅम मानेकशॉ यांचे पात्र साकारले. त्यांची देहबोली, बोलण्याची पद्धत आणि कमांडिंग उपस्थिती — सर्व काही मानेकशॉंसारखे वाटले. हा रोल विक्कीच्या अभिनय कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरला.
3. प्रियंका चोप्रा – ‘मेरी कोम’ मध्ये मेरी कोम
प्रियंका चोप्राने बॉक्सर मेरी कोम यांची भूमिका इतक्या ताकदीने साकारली की लोकांना त्यांच्या संघर्षाची आणि यशाची खरी झलक पडद्यावर पाहायला मिळाली. तिच्या अभिनयात एक आई, एक खेळाडू आणि एक जिद्दी योद्धा स्पष्टपणे दिसत होता.
4. अक्षय कुमार – बायोपिक मालिकेत विविध पात्रांमध्ये
अक्षय कुमारने ‘रुस्तम’, ‘एयरलिफ्ट’, ‘केसरी’ अशा अनेक चित्रपटांतून वास्तवावर आधारित पात्रांना जीव दिला आहे. त्याच्या भूमिकांमध्ये नेहमीच देशभक्ती, संयम आणि निष्ठा यांचे प्रतिबिंब दिसते.
5. फरहान अख्तर – ‘भाग मिल्खा भाग’ मधील मिल्खा सिंग
‘१२० बहादुर’ आधीच फरहान अख्तरने ‘भाग मिल्खा भाग’ मध्ये मिल्खा सिंग यांची भूमिका अजरामर केली आहे. त्यांनी केवळ लुकच नाही, तर मानसिक आणि भावनिक स्तरावर देखील मिल्खा सिंग यांचे जीवन अनुभवलं, आणि ते पडद्यावर उतरवलं.
6. सिद्धार्थ मल्होत्रा – ‘शेरशाह’ मधील कॅप्टन विक्रम बत्रा
सिद्धार्थ मल्होत्राने ‘शेरशाह’ मध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांची शौर्यगाथा जिवंत केली. “ये दिल मांगे मोर!” ही ओळ त्यांच्या सादरीकरणाने पुन्हा लोकांच्या मनात जोश निर्माण करणारी बनली. हा चित्रपट आणि त्यातील सिद्धार्थचा अभिनय भारतीय सिनेमाच्या इतिहासात लक्षात ठेवला जाणार आहे.
'120 बहादुर' एक अभिमानास्पद सिनेमॅटिक अनुभव
'120 बहादुर' फक्त एक चित्रपट नाही, तर हा एक सन्मान आहे त्या 120 वीर जवानांचा, ज्यांनी रेजांग ला येथे अमरत्व प्राप्त केलं. फरहान अख्तर यांचं हे पात्र आजच्या तरुण पिढीला देशभक्ती, समर्पण आणि शौर्य यांचं खरं अर्थ शिकवेल.
चित्रपटाच्या रिलीजची सर्वत्र उत्सुकता आहे, आणि चाहते तसेच समीक्षक दोघेही या भावनिक व प्रेरणादायी प्रवासासाठी सज्ज आहेत.
ही बातमी वाचा: