Bollywood Actor Life Story: साऊथ इंडस्ट्रीपासून (South Movie) अगदी बॉलिवूडवर (Bollywood) राज्य करणारे दाक्षिणात्य सुपरस्टार (South Superstar) कमल हसन (Kamal Hasan) यांनी वयाती सत्तरी गाठली आहे. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1854 रोजी तामिळनाडूतील परमकुडीमध्ये झाला.  हिंदी आणि तमिळ व्यतिरिक्त त्यांनी तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केलं आहे. फिल्म इंडस्ट्रीत 1 कोटींचं मानधन घेणारे पहिले सुपरस्टार म्हणून कमल हसन यांना ओळखलं जातं. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका सिनेमासाठी कमल हसन यांनी एक कोटींची फी घेऊन आश्चर्याचा धक्का दिला होता. कमल हसन त्यांच्या लग्झरी लाईफसाठी ओळखले जातात. आजच्या घडीला कमल हसन कोट्यवधींचे मालक आहेत. त्यांचं उत्पन्न केवळ चित्रपटांमधूनच नाहीतर अनेक वेगवेगळ्या स्त्रोतांमधून येतं. 

कधीकाळी ब्रॅकग्राउंड डान्सर म्हणून केलंय काम 

गेल्या 4 दशकांपासून अभिनय जगात सक्रिय असलेले कमल हसन यांनी अनेक चित्रपटांमध्ये ब्रॅकग्राउंड डान्सर (Background Dancer) म्हणून काम केलं. त्यांनी अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये असिस्टही केलं आहे. अनेक वर्षांच्या स्ट्रगलनंतर 1974 मध्ये त्यांना फिल्म 'कन्याकुमारी'मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या सिनेमासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. दरम्यान, त्यानं वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी 'कलथुर कन्नम्मा' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. याशिवाय, त्यांनी वाल कलाकार म्हणून इतर 5 चित्रपटांमध्येही काम केलं. 

कमल हसन यांची कामगिरी

भारतातील सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या सिनेमांमध्ये सर्वाधिक सिनेमे कमल हसन यांचे आहेत. त्यांच्या तब्बल 7 चित्रपटांचा ऑस्कर पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात त्यांच्याकडे सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. कमल हसन यांना हिंदीमध्ये दोनदा आणि दक्षिणात्य सिनेसृष्टीतून 19 वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. असंही म्हटलं जातं की, नंतर एका नव्या अभिनेत्याला हा पुरस्कार मिळावा, याकरता कमल हसन यांनी स्वतः फिल्मफेअर असोसिएशनमधून आपलं नाव मागे घेतलेलं. याशिवाय, या अभिनेत्याला 4 राष्ट्रीय पुरस्कार, 2 जीवनगौरव पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण यांसारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

600 कोटींची नेटवर्थ 

कमल हसन फिल्म इंडस्ट्रीतून कोट्यवधींची कमाई करतातच, याव्यतिरिक्त त्याच्या उत्पन्नाचे इतरही अनेक स्त्रोत आहेत. कमल हसन अत्यंत लग्झरी लाईफ जगतात. कमल हसन ज्या बंगल्यामध्ये राहतात, त्याची किंमत 131 कोटी रुपये आहेत.  चेन्नईतील त्यांच्या घरात अनेक आलिशान वस्तू आहेत. बालकलाकार म्हणून कारकिर्द सुरू करणाऱ्या कमल हसन यांचा लंडनमध्येही एक बंगला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता प्रत्येक चित्रपटासाठी 100 कोटी रुपये घेतात. तसेच, 'बिग बॉस' तमिळ होस्ट करण्यासाठीही कमल हसन कोट्यवधींचं मानधन घेतात. अभिनयाव्यतिरिक्त, ते ब्रँड एंडोर्समेंटमधूनही पैसे कमवतात. त्याचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस देखील आहे. त्यांच्याकडे अनेक आलिशान गाड्या देखील आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती 600 कोटी रुपये आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'अशी ही बनवाबनवी' सिनेमाची स्क्रिप्ट लिहण्यात माझा महत्त्वाचा वाटा, '70 रुपये वारले' डायलॉग कोणी लिहला? सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा