Amitabh Bachchan Birthday : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 11 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. 1969 पासून 2022 पर्यंत बिग बींनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांत काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा 80 वा वाढदिवस नक्कीच खास असणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 


चार दिवसीय चित्रपट महोत्सव


अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत फिल्म हेरिटेज फाऊंडेशनतर्फे 8 ते 11 ऑक्टोबरदरम्यान चार दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सादरम्यान अमिताभ यांचे 11 सिनेमे भारतातील 17 शहरांत दाखवले जाणार आहेत. अभिताभचे चाहते चार दिवसीय चित्रपट महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहे. 






अमिताभ बच्चन यांचे कोणते सिनेमे पाहू शकता?



  • डॉन

  • काला पत्थर

  • कालिया

  • कभी कभी

  • अमर अकबर

  • एंथनी

  • नमक हलाल

  • अभिमान

  • दीवार

  • मिली

  • सत्ते पे सत्ता

  • चुपके चुपके


अमिताभ बच्चन यांच्या वस्तूंचे प्रदर्शन


मुंबईतील जुहू येथील पीवीआरमध्ये अमिताभ बच्चन यांच्या काही आठवणीतील वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. एसएमएम औसाजाने या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. 


अमिताभ बच्चन म्हणाले,"माझ्या सिनेसृष्टीतील करियरच्या सुरुवातीचे सिनेमे देशभरातील सिनेमागृहांत दाखवले जातील, असा मी कधीच विचार केला नव्हता. फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि पीवीआरचं खूप खूप कौतुक. या चित्रपटमहोत्सवामुळे पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. भारतीय सिनेप्रेक्षकांसाठी हा महोत्सव नक्कीच मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे". 


संबंधित बातम्या


Goshta Eka Paithanichi : प्रतीक्षा संपली; राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमागृहात होणार प्रदर्शित


Adipurush Poster Out: प्रभासच्या ‘आदिपुरुष’ पहिलं पोस्टर रिलीज! अभिनेत्याच्या लूकवर खिळल्या नजरा