Adipurush Poster Out: साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाचे पहिले अधिकृत पोस्टर आज रिलीज करण्यात आले आहे. साऊथ सुपरस्टार प्रभासच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि प्रभासचा जबरदस्त लूक पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रभास भगवान श्री रामाप्रमाणे धनुष्यबाण लक्ष्य साधताना दिसत आहे. या पोस्टरवर त्याचा तपस्वी लूक पाहायला मिळाला आहे.


सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) हे सध्या त्यांच्या बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून लोकांमध्ये चर्चेत आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांची आतुरता लक्षात घेत निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.


पाहा पोस्टर:


 






चित्रपटाचा हे फर्स्ट लूक पोस्टर अभिनेता प्रभासने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. निर्मात्यांनी पाच भाषांमध्ये चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आरंभ. अयोध्या, यूपीमधील सरयू नदीच्या काठावर जादुई प्रवास सुरू करण्यासाठी आमच्यासोबत सामील व्हा. आमच्या आदिपुरुष चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि टीझर 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:11 वाजता अयोध्येत अनावरण होणार आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.’


‘या’ दिवशी टीझर होणार रिलीज


या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. इतकंच नाही तर, रिपोर्ट्सनुसार, चित्रपट रामायणावर आधारित असल्याने, निर्मात्यांनी त्याचा टीझर उत्तर प्रदेशातील राम जन्मस्थान असलेल्या अयोध्येत सरयू नदीच्या काठावर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.


रामायणावर आधारित चित्रपट


‘आदिपुरुष’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाचे पोस्टर समोर आल्यानंतर आता चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘आदिपुरुष’ हा रामायणावर आधारित पौराणिक चित्रपट आहे. या चित्रपटात ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास भगवान राम म्हणजेच ‘आदिपुरुष’ ही व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे. तर, अभिनेता सैफ अली खान लंकापती रावणाची म्हणजेच लंकेशची भूमिका साकारताना दिसणार आहे. यासोबतच क्रिती सेनन या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेता देवदत्त नागे हनुमानाची तर, सनी सिंहने लक्ष्मणाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :