मुंबई : 'फँड्री' सिनेमातील शालू अर्थात राजेश्वरी खरात लवकरच नव्या सिनेमात दिसणार आहे. 'अॅटमगिरी' या चित्रपटाद्वारे ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
राजेश्वरीच्या आगामी सिनेमातील नवा लूक नुकताच रिलीज झाला आहे. प्रदीप तोंगेसह मंगेश शेंडगेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात राजेश्वरीसोबत हंसराज जगताप हा मुख्य भूमिकेत आहे. तसंच राहुल पुणे हा नवा चेहरा सिनेमात दिसणार आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'फँड्री'मध्ये शालूची भूमिका साकारणाऱ्या राजेश्वरीला सिनेमात फारसे डायलॉग नव्हते. पण सिनेमाच्या कथानकातील तिची भूमिका महत्त्वाचं होती. साधी सालास मुलगी जिच्यावर काळ्या चिमणीची राख उडवण्यासाठी जीवाचा आटापीटा करणारा जब्या सर्वांच्याच लक्षात राहिला होता.
'अॅटमगिरी' ही टिपीकल लवस्टोरी नसून ती एक हटके प्रेमकथा असल्याचं राजेश्वरीने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.