शाहरुख, सलमाननंतर अक्षय कुमार 'चला हवा येऊ द्या'मध्ये
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2016 05:02 AM (IST)
मुंबई : 'झी मराठी'वरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'ने फक्त महाराष्ट्र किंवा मराठी कलाकारच नाही तर बॉलिवूड स्टार्सनाही भुरळ घातली आहे. आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारही 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर धुमाकूळ घालताना दिसणार आहे. 'चला हवा येऊ द्या'मध्ये आतापर्यंत शाहरुख खान, सोनम कपूर, जॉन अब्राहम, विद्या बालन यासारख्या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. नुकतंच सलमान खाननेही सुलतानच्या प्रमोशनसाठी 'चला हवा येऊ द्या'मध्ये उपस्थिती लावली होती.