Falguni Pathak On Neha Kakkar: प्रसिद्ध गायिका   नेहा कक्कर (Neha Kakkar)  ही तिच्या गाण्यांमुळे चर्चेत असते. अनेक वेळा नेहा ही जुन्या गाण्यांचे रिमेक तयार करत असते.   नुकत्याच रिलीज झालेल्या 'ओ सजना' या गाण्यासाठी गायिका नेहा कक्करला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. हे गाणं   फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्या 'मैने पायल है छनकाई...' (Maine Payal Hai Chhankai) या गाण्याचा रिमेक आहे. फाल्गुनी पाठक यांचे 'मैने पायल है छनकाई...'  हे गाणे 1999 मध्ये रिलीज झाले. या गाण्याचा रिमेक केल्यानं नेहाला नेटकरी ट्रोल करत आहेत. याबाबत फाल्गुनी पाठक यांनी एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाल्या फाल्गुनी पाठक? 


मुलाखतीमध्ये फाल्गुनी पाठक यांनी सांगितलं, 'शक्य असते तर मी कायदेशीर कारवाई केली असती.  याबद्दल आधी माहिती असलं असतं तर मी कायदेशीर कारवाई केली असती. मला याबद्दल माहिती नव्हती याबद्दल माफ करा. मला माहीत असते तर मी काहीतरी केले असते  एखादी गोष्ट जेव्हा स्वतःवर बेतते तेव्हाच ती चांगली कळते' 


याआधी देखील फाल्गुनी पाठक यांनी नेहा कक्करनं केलेल्या गाण्याच्या रिमेकवर प्रतिक्रिया दिली होती.  एका मुलाखतीमध्ये फाल्गुनी पाठक यांनी त्यांचे मत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं, 'या गाण्याला सर्वांकडून एवढं प्रेम मिळाल्याने मला खूप आनंद झाला.' नेहा कक्करवर कायदेशीर कारवाई करणार का? असा प्रश्न जेव्हा मुलाखतीमध्ये फाल्गुनी यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं, 'तसं करायची माझी इच्छा आहे पण माझ्याकडे ते अधिकार नाहीत.' 


नेहा कक्करच्या 'ओ सजना' या गाण्यात धनश्री वर्मा आणि प्रियांक शर्मा या कलाकारांनी काम केलं आहे. 19 सप्टेंबर रोजी नेहा कक्करचं हे गाणं रिलीज झालं. गायिका नेहा कक्कर रिमिक्स गाण्यासाठी ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने अशीच अनेक जुनी गाणी रिमिक्स केली असून, त्यामुळे तिच्यावर बरीच टीका झाली आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: