Mumbai : 'गरबा क्वीन' फाल्गुनी पाठकची (Falguni Pathak) नवरात्रोत्सवात (Navratri 2023) चांगलीच क्रेझ आहे. फाल्गुनीने 'ता-थैया' नावाचा स्टेज बँड सुरू केला आहे. भारतासह परदेशातही या बँडचे परफॉर्मन्स होतात. फाल्गुनीच्या दांडिया मुंबईत खूपच लोकप्रिय आहेत. आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. अशातच फाल्गुनी पाठकच्या दांडियाच्या पासेसचे आमिष दाखवून 156 तरुणांची फसवणूक झाली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकच्या ‘गरबा नाईट’चे पास खरेदी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 156 तरुणांना सव्वापाच लाख रुपये गमवावे लागले आहेत. आरोपीने स्वस्तात पास देण्याचे आमिष दाखवून या तरुणांची फसवणूक केली असून याप्रकरणी या तरूणांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
बोरिवली (पश्चिम) येथील फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाचा अधिकृत विक्रेता असल्याचा दावा करणारा विशाल शाह स्वस्तात पासेस देत असत्याची माहिती कांदिवलीतील एका तरूणाला मिळाली. शाहकडून या कार्यक्रमाचा पास 4,500 रुपयांऐवजी 3,300 रुपयांना मिळणार असल्याचे तक्रारदाराला समजले. त्यामुळे तक्रारदार तरूण व त्याचे मित्र पास खरेदी करण्यासाठी तयार झाले. त्यांनी इतर मित्रांनाही विचारणा केली.
अखेर तक्रारदारासह 156 जण पास खरेदी करण्यास तयार झाले. त्यानुसार तक्रारदार आणि त्याच्या दोन मित्रांनी सर्वांकडून रोख रक्कम गोळा केली. त्याबाबतची माहिती शहाला देण्यात आली होती. त्यानुसार शहाने तिघांना न्यू लिंक रोड, बोरिवली (पश्चिम) येथे गुरूवारी पोहोचण्यास सांगितले. तिथे शहाचा एक माणूस पैसे घेऊन त्यांना पास देणार होता. शहाच्या सूचनेनुसार तिघे तरुण त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी एका व्यक्तीकडे पैसे दिले. नंतर शहाने त्यांना योगी नगर येथील पत्ता दिला आणि तेथे पोहोचून पास घेण्यास सांगितले. तिघेही मित्र योगी नगर येथे पोहोचले असता त्यांना सांगितलेली इमारत सापडलीच नाही.
'गरबा क्वीन' फाल्गुनी पाठकबद्दल जाणून घ्या... (Who is Falguni Pathak)
'गरबा क्वीन' फाल्गुनी पाठकने आपल्या संस्कृतीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. गरबा प्रकार तिने सातासमुद्रापार पोहोचवला आहे. केसरीयो रंग, ओढणी ओढू के उडी उडी जाये, वादघडी वारसी, राधा ने श्याम, परी हूँ में, यांसारखी तिची अनेक गरबा गाणी प्रसिद्ध आहेत.
संबंधित बातम्या