Esha Deol Viral Video : हेमा मालिनी (Hema Malini) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांची मुलगी ईशा देओल (Esha Deol) मागील काही काळापासून बरीच चर्चेत आली आहे. तिच्या घटस्फोटामुळेही ईशा लाईमलाईटमध्ये आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ईशा ही चर्चेचा विषय ठरली आहे. ईशाचा एक नवा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय. 


ईशा ही नुकतीच मथुरेमध्ये गेली होती. मथुरेतून ईशा देओलची आई आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी भाजपकडून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. त्यानिमित्ताने ईशाने मथुरेचा दौरा केला. पण यावेळी तिने माध्यमांशी संवाद साधताना तिच्या एका गोष्टीवर साऱ्यांचच लक्ष गेलं. 


ईशाने केली लीप सर्जरी?


ईशाच्या या व्हिडिओमुळे तिने लीप सर्जरी केली आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचप्रमाणे याच आशयाच्या कमेंट्स देखील अनेकांनी केल्यात. अनेकांनी कमेंट्स करत म्हटलं की, ती याआधी अशी अजिबात नव्हती, तिने लीप सर्जरी केली आहे. या व्हिडिओनंतर ईशा बरीच ट्रोल झाल्याचं पाहायला मिळतंय. परंतु ईशाने याबाबत अद्याप कोणतीही अपडेट दिली नाही. 


ईशाच्या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस


ईशा देओलच्या व्हिडिओवर एकाने कमेंट करत म्हटलं की, लिप फिलर्सवर बॅन लावायला हवा. तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, हिच्या ओठांना काय झालं, किती वाईट दिसतंय ते. आणखी एका युजरने तर म्हटलं, आधी किती सुंदर दिसायची आता पूर्ण चेहरा बिघडवून घेतलाय. एका युजरने म्हटलं की, बॉलीवूडमध्ये सुंदर दिसण्यासाठी काय काय करावं लागतं या स्टार्सना. अशाच अनेक कमेंट्स ईशाच्या या व्हिडिओवर आल्या आहेत. 


आईच्या प्रचारासाठी लेक मैदानात 


लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराकडून आपल्या भागात प्रचाराची जोरदार तयारी सुरु आहे. अभिनेत्री हेमा मालिनी यांना मथुरेतून भाजपने तिकीट दिलं आहे. त्यानंतर आता आईच्या प्रचारासाठी लेकही मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय.






ही बातमी वाचा : 


Alia Bhatt on Mental Health : राहाच्या जन्मानंतर दर आठवड्याला घेतेय थेरपी, आलियाला नेमकं काय झालंय? म्हणाली, मी माझ्या मानसिक आरोग्यावर...