Ranbir Kapoor: रणबीर कपूर सध्या त्याच्या मुलीमुळं सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. त्याची आई आणि आलियाही कुठल्या न कुठल्या मुलाखतीत रणबीरविषयी बोलताना दिसतात. पण सध्या सोशल मीडियावर रणबीरचा एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.
रणबीरनं त्याच्या स्पॉट बॉयचा वाढदिवस साजरा करताना दिसलाय. त्याला केक भरवत त्यानं मिठी मारत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्याच्याशी बोलता बोलता खुर्चीवर पडलेला केक त्यानं नकळत साफ केला. त्याच्या या कृतीचं नेटकऱ्यांना अप्रूप वाटतंय.
केक भरवला, फासला, गळाभेट देत शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या लव्ह अँड वॉर या चित्रपटासाठी शुटिंग करत आहे. या सिनेमाच्या सेटवरील त्याच्या स्पॉटबॉयचा वाढदिवस असल्याचं कळताच रणबीर आणि त्याच्या टीमने त्याला केक कापायला लावत त्याचा वाढदिवस साजरा केल्याचं दिसलं. रणबीरनं केक तर भरवलाच पण थोडासा केक तोंडालाही लावला. नंतर मिठी मारत त्यानं त्याच्या सहकाऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.
लक्षात आल्याआल्या सांडलेला केक स्वच्छ केला
वाढदिवस साजरा करताना केक बाजूला असलेल्या खूर्चीवर पडल्याचं लक्षात आल्या आल्या टिश्यू पेपर घेत त्यानं लगेच केक साफ केल्याचंही दिसलं.
नेटकऱ्यांनी केलं रणबीरचं कौतूक
नकळत पडलेला केक साफ करताना दिसल्यानं सोशल मीडियावर चाहत्यांनी रणबीरचं कौतूक केलंय, कामाच्या सेटवर त्यानं त्याच्या सहकारी स्पॉटबॉयचा वाढदिवस साजरा करत त्याला शुभेच्छा दिल्याची त्याची कृती चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. अनेकांनी त्याच्या कृतीला गोड म्हणलंय.
रामायण चित्रपटामुळेही रणबीर चर्चेत
नितेश तिवारीचा (Nitesh Tiwari) 'रामायण' (Ramayana) हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेच्या घोषणेची वाट पाहत आहेत. अखेरिस प्रेक्षकांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून रणबीर कपूर-यश-साई पल्लवी हे कलाकार असलेला रामायण या सिनेमांच्या तारखांविषयी अधिकृत पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा: