Bollywood Movies: जर तुम्ही ओटीटीवर (OTT) चित्रपट (Movies) पाहण्याची आवड असेल, तर आज आम्ही तुम्हाला एका खास चित्रपटाबाबत सांगणार आहोत. डॅमियन पॉवर (Damien Power) दिग्दर्शित आणि अँड्र्यू बॅरर आणि गॅब्रिएल फेरारी यांनी लिहिलेला हा अमेरिकन थ्रिलर चित्रपट आहे. 2017 मध्ये याच नावाची कादंबरी आली. या आधारावर निर्मात्यांनी 'नो एक्झिट' चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. चित्रपटातील सेलिब्रिटींबाबत बोलायचं झालं तर, हनाना रोज लिऊ, डॅनी रामिरेझ, डेव्हिड, डेल डिकी आणि डेनिस हेसबर्ट सारखे कलाकार आहेत.

25 फेब्रुवारी 2022 रोजी 'नो एग्जिट' (No Exit) रिलीज झाली होती. एक तास 35 मिनिटांच्या या चित्रपटाच्या सुरुवातीपासून तुम्हाला थ्रिलर आणि सस्पेन्सचा डोस मिळण्यास सुरुवात होते. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल, तर ओटीटी प्लॅटफॉर्म Hulu वर पाहू शकता.                                   

'नो एक्झिट'ची कथा डार्बी थॉर्न (हवाना रोज लिऊ) भोवती फिरते. ती अंमली पदार्थांच्या व्यसनातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मग एक दिवस तिला फोन येतो की, तिची आई हॉस्पिटलमध्ये दाखल आहे आणि तिच्यावर इमर्जन्सी सर्जरी झाली आहे. अनेकजण तिला रिहॅबमधून जाण्यास मनाई करतात. तिचं व्यसन आणि इतर समस्यांमुळे तिथे न जाण्याचा इशाराही ते देतात. पण ती तिथून पळून जाते. सगळीकडे बर्फवृष्टी झाल्यामुळे परिस्थिती गंभीर झालेली असते. ती एवढ्या अडचणीत येते की, पुढे काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडतो. आता काय होणार? या विचारानंच तुमची धडधड वाढते. मग तिला एक मुलगी भेटते, जी खूपच संकटात आहे. असं दिसतं की, ती अडकली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. आता ती या संकटांमधून ती बाहेर पडू शकेल का, हेच तुम्हाला दीड तासाच्या चित्रपटात पाहायला मिळेल. 

चित्रपटात खलनायकांच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनीही चमकदार कामगिरी केली आहे. तरी सर्वात मोठी जबाबदारी डार्बी म्हणजे, हवानाच्या खांद्यावर होती. हवाना ही अमेरिकन अभिनेत्री, नृत्यांगना आणि डिझायनर आहे. जिनं या चित्रपटांत चांगलं काम केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

जेव्हा, बॉलिवूडच्या खिलाडी कुमारनं अंडरटेकरला उचलण्याच्या नादात कंबरडच मोडून घेतलेलं; अक्षय कुमारसोबत नेमकं काय घडलेलं?