Celebrity Diary : मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं. एखाद्या सेलेब्रिटी वैयक्तिक आयुष्यात कसा आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. कलाकारांना मायबाप रसिकप्रेक्षकांची साथ लाभल्यामुळे त्यांच्या अभिनयाचा आलेख उंच होत जात असतो. 'सेलिब्रिटी डायरी'च्या माध्यमातून जाणून घेऊयात घराघरांत पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी अर्थात हार्दिक जोशीच्या (Hardeek Joshi) रोजच्या आहारापासून ते त्याचा मनोरंजन सृष्टीतला आदर्श कोण आहे? 

'मैत्री' हा शब्द ऐकल्यावर कोणाचं नाव समोर येतं?

- एका व्यक्तीचं नाव नाही घेता येणार. रुईया नाका आणि शिवाजी पार्क

कोणता रिअॅलिटी शो करायला आवडेल?

 - ट्रेवल शो... भारतीय सैन्या संबंधित एखादा ट्रेवल शो करण्याची इच्छा आहे. जेणेकरून ती बाजूदेखील अनुभवता येईल. 

पुढचा प्रोजेक्ट कोणासोबत करायला आवडेल?

  • महेश मांजरेकर
  • रोहित शेट्टी

भावा-बहिणीचे किंवा मैत्रीणीचे/ मित्राचे कपडे शेअर केले आहेत का?

- हो... भावाचे कपडे शेअर करतो. त्याचे जुने कपडे मी अजूनही वापरतो. 

गॅलरीतला शेवटचा स्क्रिनशॉट

स्वयंपाकातील कोणते पदार्थ बनवता येतात?

- भात लावता येतो, पोळी बनवता येते, चहा, लिंबू सरबत आणि ताक चांगलं बनवता येतं.  

आवडता खाद्यपदार्थ -

- मला साधं जेवण करायला आवडतं. वरण-भात, तूप, लोणंचं, भाजी किंवा दही, दूध- भात त्यात मेतकूट आणि तूप. 

सध्याच्या राजकारणावर एक वाक्य - 

- राजकारणाचा परिणाम सामान्य माणसांवर नक्कीच होत आहे. पण सध्या सुरू असलेल्या राजकारणावर सामान्य माणूस काहीच करू शकत नाही. कारण त्याच्यासमोरच्या समस्या वेगळ्या आहेत. वाढती महागाई, पेट्रोलचे दर, जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडणारे दर ही त्याच्यापुढची सध्या मोठी आव्हाने आहेत. 

मनोरंजन सृष्टीतला आदर्श?

  • संजय नार्वेकर
  • महेश मांजरेकर
  • दीपिक प्रभावळकर
  • लक्ष्मीकांत बेर्डे
  • अशोक सराफ  

हार्दिक जोशीबद्दल जाणून घ्या...

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून हार्दिक जोशी घराघरांत पोहोचला. त्याने साकारलेली 'राणादा'ची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 2016 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'रंगा पंतगा' या सिनेमातदेखील हार्दिक दिसून आला होता. 'राधा ही बावरी', 'दुर्वा', 'अस्मिता', 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या लोकप्रिय मालिकांमध्ये हार्दिकने काम केलं आहे. हार्दिकचा 'चतुर चोर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हार्दिक लवकरच अक्षया देवधरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. 

संबंधित बातम्या

 

Celebrity Diary : पूजा सावंतच्या मोबाईल गॅलरीतला शेवटचा स्क्रिनशॉट ते पुढचं काम तिला कोणासोबत करायचंय जाणून घ्या...

Akshaya - Hardik Engagement : तु्म्ही केलेलं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही..., अंजलीबाईंनी साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार