Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज क्वॉरंटाईनचा शेवटचा दिवस आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीतदेखील सुधारणा होत आहे. अमिताभ यांनी दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. 


अमिताभ बच्चन यांना 23 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. कुटुंबातील सदस्य घरी नसल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली नाही. अमिताभ बच्चन यांना सर्दी, ताप, डोकेदुखीसारखी कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. 






अमिताभ कोरोनाकाळात त्यांची सर्व कामं स्वत: करत आहेत. स्वत: चे कपडे धुण्यापासून ते टॉयलेट स्वच्छ करण्यापर्यंत ते घरातील सर्व कामं करत आहेत. अमिताभ स्वत: चहा-कॉफीदेखील बनवत आहेत. 


कौन बनेगा करोडपती 14' (Kaun Banega Crorepati 14) हा कार्यक्रम 7 ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या कार्यक्रमच्या सूत्रसंचालनाची धुरा अमिताभ बच्चन सांभाळत आहेत. पण आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याने 'कौन बनेगा करोडपती 14'चे शूटिंगला ब्रेक लागला आहे. 


अमिताभ बच्चन यांना पहिल्या लाटेतदेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी अमिताभ यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्यालादेखील कोरोनाची लागण झाली होती. पहिल्या लाटेत अमिताभ यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


संबंधित बातम्या


Amitabh Bachchan : कोरोनाची लागण झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांची बदलली लाईफस्टाईल; बिग बी सध्या करतात तरी काय?


Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती