Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यामुळे केतकीला तुरुंगवास भोगावा लागला होता. तसेच तिला तिच्या फेसबुक अकाऊंटचा वापर करण्यालाही मनाई करण्यात आली होती. पण आता तिला तिचं फेसबुक अकाऊंट परत मिळाले आहे.
केतकी चितळेला तिचं फेसबुक अकाऊंट परत मिळालं आहे. तिने फेसबुक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. केतकीनं लिहिलं आहे,"अखेर मला माझ्या फेसबुकचा अॅक्सेस परत मिळाला आहे. निदान सध्यापुरता तरी." काही तासांपूर्वी शेअर केलेल्या केतकीच्या पोस्टला नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे".
केतकी चितळे प्रकरण काय?
आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत 14 मे रोजी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात राज्यभरात विविध गुन्हे दाखल झाले होते. केतकी चितळेनं ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं असून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केली होती. त्यामुळे केतकीवर सध्या 21 विविध गुन्हे दाखल आहेत. पण आता 11 जुलैपर्यंत केतकीला ताब्यात घेतले जाणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे.
केतकी चितळे कोण आहे?
'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेच्या माध्यमातून केतकी घराघरांत पोहोचली होती. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. गेल्या काही वर्षापासून केतकीला अपस्मार हा आजार आहे. या आजारावर केतकी वेगवेगळ्या मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे. त्यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
संबंधित बातम्या