Ramayan: नितेश तिवारी यांच्या रामायण फिल्मची सध्या जोरदार चर्चा आहे. रामायण या सिनेमात रामाची भूमिका बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर साकारणार आहे. तर दक्षीण भारतीय नटी साई पल्लवी सीतेची भूमिका करत आहे. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची मोठीच उत्सूकता आहे. या सिनेमाची तुलना रामायण या मालिकेशी आतापासूनच होताना दिसत आहे. दूरदर्शनवर येणाऱ्या रामायण या मालिकेचे लाखोंच्या संख्येत चाहते होते. आजही अनेकजण रामायण मालिकेतील कलाकारांचं कौतूक करताना दिसतात. अशातच या चित्रपटाबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. जुन्या रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल यांचीही या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे.


नितेश तिवारी याने दिग्दर्शित केलेल्या रामायण या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाले आहे. या फिल्ममध्ये कौसल्याचा रोल इंदिरा कृष्णन करणार असून  जुन्या रामायणात राम साकारलेले अरुण गोविल या चित्रपटात दशरथाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. या चित्रपटाच्या स्टारकास्टबाबत अनेक माहिती समोर आली असून लक्ष्मण, दशरथ, कैकयी, कौसल्या यांच्या भूमिका कोणी केल्या आहेत. याबद्दल नुकताच खुलासा करण्यात आला.


दशरथ कौसल्येच्या भूमिकेत हे कलाकार


दूरदर्शनवर पूर्वी लागणारी रामायण ही पौराणिक मालिका आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल. या मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अरुण  गोविल हे रामायण या नव्या चित्रपटातही महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. ते या सिनेमात राजा दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर टेलिव्हिजनमधील अनेक मालिकांमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री इंदिरा कृष्णन या कौसल्येच्या भूमिकेत दिसणार आहेत.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी कौसल्या यांची भूमिका मिळाल्याबद्दल आनंतद व्यक्त केला. यात त्यांनी रवी दुबे हे लक्ष्मणाच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं. तर हा चित्रपट १०० टक्के यशस्वी होईल असेही सांगितलं.


पौराणिक मालिकेतील रामाची भूमिका गाजवली


अरुण गोविल हे रामायण या पौराणिक मालिकेतील रामाच्या भूमिकेने देशभर प्रसिद्ध झाले. आजही अनेकजण रामाची भूमिका म्हटली की अरुण गोविल यांच्या भूमिकेची आठवण काढताना दिसतात. टेलिव्हिजनवर प्रभू रामाची संस्मरणीय भूमिका साकारणारे अरुण गोविल या चित्रपटात दशरथाची भूमिका साकारणार आहेत. याच इंदिरा कृष्णन त्यांच्या भूमिकेविषयी बोलताना म्हणलं, “ते खरोखर दशरथासारखे दिसत होते, तसे ते त्या वेळी रामसारखे दिसत होते. आम्ही शूटिंग करत असताना ते रामायण बनवण्याच्या वेळेबद्दल कायम बोलायचे.