Rajpal Yadav:'भूलभुलय्या 3' मध्ये छोटा पंडितची भूमिका साकारणाऱ्या राजपाल यादवने नुकतीच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हात जोडून माफी मागितली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आलाय . खरंतर राजपाल यादवने नुकताच सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता . या व्हिडिओ वरून समाज माध्यमांवर ट्रोल झाल्याचा समजताच त्याने हा व्हिडिओ तातडीने डिलीट केला होता . या व्हिडिओमुळे त्यानं सगळ्यांची हात जोडून माफी मागितली आहे .
काय होतं डिलीट केलेल्या व्हिडिओमध्ये?
ज्या व्हिडिओमध्ये फटाके फोडू नका असं सांगताना तो दिसत होता. फटाक्याने प्रदूषण होतं . जनावरं घाबरतात. त्यामुळे यंदाची दिवाळी शांततेत साजरी करावी असं आवाहन त्याने या व्हिडिओत केलं होतं. हा व्हिडिओ त्यांना सोशल मीडियावर शेअर केला होता . पण आईने दिवाळीत फटाके वाजवू नका असा आवाहन केल्याने राजपाल यादव चांगलाच ट्रोल झाला . रोल झाल्यावर लगेच राजपालने हा व्हिडिओ डिलीट केला आणि आता त्याने नवा व्हिडिओ शेअर केला आहे . ज्यात त्यानं प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली आहे .
मी हृदयातून माफी मागतो ..
मी मनापासून माफी मागतो . माझा उद्देश दिवाळीचा आनंद कमी करण्याचा नव्हता . दिवाळी आपल्या सर्वांसाठी आनंद आणि प्रकाशाचे पर्व आहे . आणि या सगळ्याला सुंदर बनवणं हा आपला उत्सव आहे . तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप सार्या शुभेच्छा आणि प्रेम .चला सर्वांनी मिळून दिवाळीला खास बनवू ..असं म्हणत राजपाल यादव ने त्याच्या व्हिडिओबद्दल सगळ्यांची माफी मागितली आहे . त्याने आधीचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावरून डिलीटही केला आहे .
कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ...
दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मी एक व्हिडिओ शेअर केला होता . जो व्हिडिओ मी तात्काळ हटवला आहे . या व्हिडिओमुळे ज्या कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याला मी हृदयातून क्षमा मागतो . दिवाळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा . छान रहा आनंदी राहा .जय हिंद जय भारत . असं त्याने या व्हिडिओमध्ये म्हटलंय .