Squid Game : नेटफ्लिक्स (Netflix) ची 'स्क्विड गेम' (Squid Game)ही वेबसीरिज जगभरात लोकप्रिय होत आहे. प्रेक्षकांनादेखील ही वेबसीरिज प्रचंड आवडत आहे. पण आता या लोकप्रियतेची शिखर गाठलेली वेबसीरिज पाहण्यासाठी लहान मुलांना दूर ठेवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. इंग्लिश काउंसिलने पालकांना आवाहन केले आहे ,"लहान मुलांना या वेबसीरिज पाहण्यापासून दूर ठेवा". 6 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुले ही वेबसीरिज पाहून हिंसक कृत्ये करताना दिसून येत आहेत.
'स्क्विड गेम' पासून लहान मुलांना ठेवा दूर
सेंट्रल बेडफोर्डशायर काउंसिल (Central Bedfordshire Council) ने जाहीर केले आहे की, लहान मुले आणि तरुण मंडळी ही वेबसीरिज पाहून अनेक हिंसक कृत्ये करताना दिसून येत आहेत. लहान मुले त्यांच्या मित्रांना ही सीरिज बघून चॅलेंज देत आहेत. तसेच ते चॅलेंज जो स्विकारणार नाही तो शारीरिक हिंसेला बळी पडत आहे. मागील महिन्यात बेल्जियम शाळेने सांगितले,"स्क्विड गेम'मध्ये ज्या पद्धतीने एकमेकांना गोळ्या मारण्यात येत आहेत. त्याचपद्धतीने शाळेतील मुले एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत". त्यामुळेच सेंट्रल बेडफोर्डशायर काउंसिलच्या अहवालानुसार ही वेबसीरिज लहान मुलांना दाखवू नये.
काय आहे 'स्क्विड गेम'चे कथानक
'स्क्विड गेम'चे 9 भाग आलेले आहेत. ह्वांग डोंग-ह्यूक (Hwang Dong-Hyuk) ने 'स्क्विड गेम' दिग्दर्शित केली आहे. ही वेबसीरिज 17 सप्टेंबर 2021 ला प्रदर्शित करण्यत आली होती. कोरियन खेळामुळे कर्जात बुडालेल्या 456 लोकांवर भाष्य करते. लोकांना पैशाचे आमिश दाखवत खेळात सहभागी करुन घेतले जाते. त्यानंतर त्या सर्व लोकांना मारण्यात येते. हा खेळ जिंकलेल्या व्यक्तीला 38.7 मिलिअन डॉलर मिळतात.
'स्क्विड गेम' वेब सीरिजने तोडले रेकोर्ड
'स्क्विड गेम' या साउथ कोरियन वेब सीरिजला अनेकांनी पसंती दिली आहे. एका महिन्यामध्ये 'स्क्विड गेम' या वेब सीरिजला 132 मिलियन लोकांनी 2 मिनीटांपर्यंत पाहिले. ही वेब सीरिज 17 सप्टेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाली होती. लोकांची पसंती मिळवणाऱ्या ब्रिजर्टन या वेब सीरिजने आधी हा रेकोर्ड तयार केला होता. या सीरिजला 28 दिवसांमध्ये 82 मिलियन लोकांनी पाहिले होते. ब्लूमबर्गनुसार, 'स्क्विड गेम' पाहण्यास सुरू करणाऱ्या 89% लोकांनी या वेब सीरिजला कमीत कमी 75 मिनटांपर्यंत पाहिले. त्यापैकी 66% प्रेक्षकांनी 23 दिवसांमध्ये सीरिज पाहून संपवली.